लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात येत आहेत. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात नव्याने बदलून आलेल्या 13 निरीक्षकांच्या विविध पोलीस ठाण्यात तसेच गुन्हे शाखेत नेमणुक करण्यात आली आहे. तसेच शिरपूर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांची पिंपरी चिंचवड पोलीस दलात सहायक पोलीस आयुक्तपदी बदली झाली आहे. यापूर्वी नव्याने बदलून आलेले सहायक पोलीस आयुक्त देवीदास घेवारे यांनी देहूरोड तर सहायक पोलीस आयुक्त राजू मोरे यांनी चिंचवड विभागाचा पदभार स्विकारला आहे. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
मागील महिन्यात पिंपरी चिंचवड पोलीस दलातील सहायक पोलीस आयुक्त विठ्ठल कुबडे आणि डॉ. विवेक मुगळीकर यांची बदली झाली आहे. तसेच एसीबी अमरावती येथील अपर पोलीस अधीक्षक देवीदास घेवारे आणि सोलापूर शहर पोलीस दलाचे एसीपी राजू मोरे यांचीही पिंपरी चिंचवड पोलीस दलात सहायक आयुक्तपदी बदली झाली आहे. दरम्यान राज्यातील 130 पोलीस निरीक्षकांची विविध घटकांमध्ये बदली झाली. त्यामध्ये पिंपरी-चिंचवड दलात 13 पोलीस निरीक्षक बदली होऊन आले. त्यांची नियंत्रण कक्षातून विविध पोलीस ठाण्यांमध्ये नेमणूक केली आहे. ( Appointment of 13 Police Inspectors in Pimpri Chinchwad Police Force )
नेमणूक केलेले पोलीस निरीक्षक :
- पोलीस निरीक्षक अशोक कडलग – पिंपरी पोलीस स्टेशन
- शत्रुघ्न माळी – निगडी पोलीस स्टेशन
- निवृत्ती कोल्हटकर – वाकड पोलीस स्टेशन
- कन्हैया थोरात – हिंजवडी पोलीस स्टेशन
- प्रदीप रायन्नावार – तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन
- अंकुश बांगर – तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन
- जितेंद्र कोळी – चिंचवड पोलीस स्टेशन
- प्रमोद वाघ चाकण पोलीस स्टेशन
- नितीन गीते महाळुंगे पोलीस स्टेशन
- विजय वाघमारे – देहूरोड पोलीस स्टेशन
- सुहास आव्हाड – गुन्हे शाखा
- गोरख कुंभार – गुन्हे शाखा
- संदीप सावंत – गुन्हे शाखा
अधिक वाचा –
– विमानाला लागणाऱ्या इंधनाचा काळा बाजार, सोमाटणे येथे पोलिसांची धडक कारवाई, 5 जण रंगेहात ताब्यात । Pune Crime
– मावळ तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शिळींब गावच्या अध्यक्षपदी नेहा दरेकर यांची नियुक्ती । Maval News
– विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा युवा सेनेच्या वतीने सन्मान । Pimpri Chinchwad