दिवाळी हा भारतातील प्रामुख्याने हिंदू धर्मियांचा प्रमुख सण आहे. या सणाची सुरुवात वसुबारस या सणाने होते. यावर्षी 21 ऑक्टोबरला वसुबारसचा सण साजरा केला जात आहे. हा सण ‘गोवत्स द्वादशी’ म्हणूनही ओळखला जातो. गाय आणि वासरु यांची पूजा करण्याचा दिवस म्हणजे वसुबारस.
वासू बारस पूजा पद्धत : या दिवशी दूधदूभत्या जनावरांची गंध, कुंकूम, अक्षता वाहून पूजा केली जाते. सुगंधी फुलांचा हार घालून गायीला अर्घ्य दिले दाते. तांब्याच्या कलशातले ताज्या पाण्याचे अर्घ्य वासराच्याच्या पायांवर सोडले जाते. त्यानंतर पुरणपोळी किंवा गोडाचा नैवैद्य त्यांना दिला जातो. ( Diwali festival Vasubaras 2022 Significance and worship of method vasu baras )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
मावळमधील या नेते, प्रतिनिधींनी दिल्या वसूबारच्या शुभेच्छा :
दिपावलीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस…’गाय’ ही भारतीय संस्कृती व शेतीचा आधारस्तंभ आहे, त्यांचे पालनपोषण करणे आपले कर्तव्य आहे. वसुबारस निमित्त पशुधनाप्रती कृतज्ञता व्यक्त करूया! दिव्यांच्या लखलखाटात सगळीकडे समृद्धी आणि नवे तेज घेऊन येणारी दीपावली आपल्या सर्वांच्या जीवनात नवा आनंद घेऊन येवो…! – सुनिल शेळके (विद्यमान आमदार मावळ
आज वसुबारस दिवाळीचा पहिला दिवस,ही दिवाळी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना सुखाची, समुध्दीची व भरभराटीची जावो..! – बाळा भेगडे (माजी आमदार मावळ, माजी राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य)
दिवस कृतज्ञता व्यक्त करण्याचा, गाय अन वासराच्या वात्सल्याचा दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा! – रविंद्र भेगडे (मावळ भाजपा तालुकाध्यक्ष)
बळीराजाच्या जीवनात अनन्यसाधारण महत्व असणाऱ्या गाई-वासराची पूजा करून वसुबारस साजरी केली जाते. गाई-वासराबद्दल कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या या सणाचं आपल्या कृषीप्रधान संस्कृतीत मोलाचं स्थान आहे. गाय आणि वासराच्या अंगी असणारी उदारता, प्रसन्नता, शांतता आणि समृद्धी आपणा सर्वांना लाभो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना !!! वसुबारस निमित्त आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. – श्रीरंग उर्फ आप्पा बारणे (खासदार, मावळ लोकसभा )
अधिक वाचा –