दिवाळी निमित्त सर्वत्र आनंद असतो. परंतू गरिबांची, गरजूंची देखील दिवाळी गोड व्हायला हवी, यासाठी H2O फाउंडेशन तर्फे दिवाळीचे पदार्थ आणि किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले. माळेगांव खुर्द, कुणेवाडी, तळपेवाडी (ता.मावळ) या आदिवासी गावांत एचटूओ फाउंडेशनने दिवाळीचे साहित्य, फराळ आणि किराणा साहित्य प्रत्यक्ष जाऊन वाटप केले.
H2O फाउंडेशनचा हा उपक्रम खरोखरच सामाजिक सलोखा, अस्मिता जपणारा आणि स्नेह वाढवणारा आहे. या प्रसंगी H2O FOUNDATION चे अध्यक्ष प्रविण साळवी, सेक्रेटरी निरंजन सातकर आणि सभासद सतिश टकले, योगेश कोतकर, निलेश उगवे, किरण देसाई, वैभव दराडे, मयुर कोतकर आणि परिवार उपस्थित होता. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
यावेळी पंचायत समिती मावळचे माजी सभापती शंकरराव सुपे यांनी H2O FOUNDATION चे अध्यक्ष प्रविण साळवी आणि H2O परिवार सदस्यांचा सत्कार केला. त्यांचे स्वागत आणि उपक्रमाचे कौतुक बाजीराव सुपे सर यांनी केले. यावेळी बिरसा ब्रिगेड मावळचे अध्यक्ष शंकर बोऱ्हाडे, समन्वयक राष्ट्रवादी आदिवासी सेलचे अध्यक्ष सोपान गोंन्टे, किसन सुपे, दिव्यांग लाभार्थी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. ( Diwali gift to disabled and needy in maval taluka villages through H2O Foundation )
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यात भाजपाची सरशी! 10 ग्रामपंचायतींवर भाजपाचे ‘कारभारी’, गटातटाच्या राजकारणाचा राष्ट्रवादीला फटका
– ग्रामपंचायत निवडणूक निकाल 2023 : ग्रामपंचायत सुदुंबरे : वाचा अंतिम निकाल, पाहा विजयी उमेदवारांची यादी
– ग्रामपंचायत निवडणूक निकाल 2023 : ग्रामपंचायत कोंडिवडे (आं.मा.) : वाचा अंतिम निकाल, पाहा विजयी उमेदवारांची यादी