मावळ तालुक्यातील फुल उत्पादक शेतकरी ज्ञानेश्वर ठाकर यांना नुकताच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ‘आदर्श कृषीनिष्ठ शेतकरी’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. दरवर्षी कृषी क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या प्रगतशील शेतकऱ्यांना, तालुका पंचायत समितीच्या शिफारशीने, जिल्हा परिषदेकडून ‘आदर्श कृषीनिष्ठ शेतकरी’ पुरस्कार दिला जातो.
त्यानुसार यंदा पुण्यातील अल्पबचत भवन येथे जिल्हा परिषद पुणे अंतर्गत येणाऱ्या तालुक्यातील आदर्श अंगणवाडी सेविका, मदतनीस, शरद आदर्श कृषीग्राम, कृषीनिष्ठ शेतकरी, आदर्श गोपालक, उत्कृष्ठ पशुवैद्यकीय अधिकारी व शिक्षण विभागातील विजेते स्पर्धक यांना जिल्हास्तरीय पुरस्काराचे वितरण करण्यात आले. ( Dnyaneshwar Thakar From Pavan Maval Taluka Awarded Pune Zilla Parishad Ideal Farmer Award )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक शालिनी कडू, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, पिंगट साहेब, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष निर्मलाताई पानसरे, कृषी व पशुसंवर्धन विभागाचे माजी सभापती बाबुराव वायकर, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य काळूराम विधाते, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल पाचरणे, जिल्हा परिषद सदस्य सविताताई बगाटे आदी मान्यवर उपस्थित होते.
हेही वाचा – येळसे गावातील काळूबाई मंदिर परिसराचे होणार काँक्रिटीकरण, विश्वजीत बारणेंच्या हस्ते भूमीपूजन संपन्न
पवना फुल उत्पादक संघटनेचे सचिव शेतकरी ज्ञानेश्वर ठाकर यांचे येळसे येथे 3 एकर 20 गुंठे क्षेत्रात पॉलिहाऊस असून त्यामध्ये त्यांनी विविध प्रकारच्या देशी-विदेशी गुलाबांची शेती केली आहे. संपूर्ण देशासह प्रदेशात देखील त्यांचा गुलाब निर्यात होत असतो. ते पारंपारिक पिकेही दरवर्षी घेत असतात. किड नियंत्रणासाठी गंध सापळे, गोबरगॅस, सौर उर्जेवर चालणारे सापळे, शेडनेट हाऊस आदी वेगवेगळे प्रयोग ही त्यांनी आपल्या शेतात केले आहेत. त्यांच्या याच उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. तर पुरस्कारासाठी निवड केल्याबद्दल ठाकर यांनी मावळ पंचायत समितीचे व पुणे जिल्हा परिषदेचे आभार मानले.
अधिक वाचा –
– ‘दिव्यांग बांधवांना पेन्शन वाढवून आणि वेळेवर मिळावी’, तळेगाव शहर भाजपाचे नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन
– पती कामानिमित्त गुजरातला अन् पत्नी मुलांसह माहेरी, चोरट्याने ‘हीच ती वेळ’ म्हणत घर केले साफ, उर्से गावातील घटना