Dainik Maval News : भाऊबीज म्हणजे प्रेम, जिव्हाळा, विश्वास आणि आपुलकीचं प्रतीक. या दिवशी बहिणी आपल्या भावाला ओवाळून त्याच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करते, आणि भाऊ तिचं रक्षण करण्याचं वचन देतो. योग्य मुहूर्त आणि नियम पाळून हा सण साजरा केल्यास तुमच्या आयुष्यात आनंद, शांती आणि समृद्धी नक्की येईल. यामुळे भाऊबीज साजरी करताना काही गोष्टी प्रकर्षाने टाळणे गरजेचे आहे. ( Do not make these mistakes on Bhaubeej Know right time to celebrate Bhaubij in Diwali )
भाऊबीज हा सण भावंडांच्या अतूट नात्याचा आणि प्रेमाचा पवित्र सण आहे. यंदा गुरुवारी, दिनांक २३ ऑक्टोबर रोजी भाऊबीज साजरी होत आहे. हा दिवस यम द्वितीया किंवा भत्री द्वितीया म्हणूनही ओळखला जातो. दिवाळीच्या अर्थात लक्ष्मीपूजनाच्या दोन दिवसांनी हा दिवस येतो. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या कपाळावर टिळा लावते आणि त्याच्या दीर्घायुष्य, सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करते.
भाऊबीजेसाठी शुभकाळ …
यंदा भाऊबीजेला टिळक लावण्याचा सर्वात शुभ काळ हा दुपारी १:१३ ते ३:२८ वाजेपर्यंत आहे. या काळात टिळक लावल्यास शुभ फळ मिळते. टिळा लावताना भावाने उत्तर किंवा वायव्य दिशेकडे तोंड करून बसावे. उत्तर दिशा धन-संपत्तीचे प्रतीक मानली जाते, तर वायव्य दिशा प्रगती आणि समृद्धी आणते. बहिणीने पूर्व किंवा ईशान्य दिशेकडे तोंड करून बसावे कारण या दिशा सकारात्मक ऊर्जा आणि शांती देतात.
भाऊबीजेला या चुका टाळा …
1. राहुकाल आणि भद्रकाल यांसारखे अशुभ काळ टाळा
2. फक्त शुभ वेळेतच तिलक लावा
3. भाऊबीज सणाला कांदा, लसूण, मांस किंवा मासे यांसारखे तामसिक पदार्थ खाणे टाळा
4. सात्विक आणि शुद्ध अन्न खाणे योग्य राहील
5. बहीण भावाला भेटवस्तू देताना कात्री, चाकू किंवा बूट. चपला यांसारख्या वस्तू देणे टाळा
टीप : ही माहिती संग्रहित असून केवळ वाचकांच्या माहितीस्तव आहे. या लेखातील मते व अन्य बाबी वाचकांवर बंधनकारक नाहीत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना : ‘पाणंद रस्ते’ कामांना गती देण्यासाठी आमदारांच्या समितीला मिळणार अधिकार
– ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियानाचा तिसरा टप्पा ३ नोव्हेंबरपासून – वाचा सविस्तर
– जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली, पोलीस अधीक्षकांच्या सुचनाही नजरेआड ; लोणावळा शहरात अवजड वाहनांची वाहतूक सुरूच
