सहा ते सात महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या नवविवाहितेने गळफास घेऊन आत्म’हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार मावळ तालुक्यात घडला आहे. सदर मुलीच्या आत्म’हत्येनंतर तिच्या वडीलांनी याबाबत लोणावळा शहर पोलिसांत फिर्याद दिली. त्यावरून मयत मुलीचा नवरा, सासरा, सासू आणि नणंद यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
पोलिसांनी मुलीचा नवरा अथर्व कांबळे, मुलीचा सासरा महेश कांबळे आणि मुलीची सासू व नंणद यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. सर्वजण लोणावळा शहरातील रहिवासी आहे. त्यांच्यावर भा.द.वि.क. 498 (अ ), 304 (ब ) 504, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( dowry case newly married girl suicide in lonavala )
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत मुलीच्या वडीलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार लग्नांतर मुलीचा पती, सासरा, सासू आणि नणंद यांनी वेळोवेळी मुलीला कपड्यावरून, बोलण्यावरून सतत टोमणे देऊन तसेच लग्नामध्ये मानपान केला नसल्याच्या कारणावरून आणि लग्नात पाहिजे तेवढा हुंडा दिला नाही, अजून हुंडा आई-वडिलांकडून घेऊन ये, असे सतत बोलून मुलीला शारिरीक आणि मानसिक त्रास देत तिचा छळ केला होता, असे फिर्यादीत नमूद आहे.
तसेच यामुळेच मुलीला आत्महत्येस प्रवृत्त केले आणि तिच्या मयतास कारणीभूत ठरल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच आरोपी अटकेत आहेत. वडगांव मावळ न्यायालयात आरोपींना हजर केले असता त्यांना कोठडी सुनावण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचा तपास लोणावळा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि पोवार लोणावळा करत आहेत.
अधिक वाचा –
– पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणानंतर प्रशासनाचे कठोर पाऊल ! तब्बल 32 रूफटॉप, पब आणि बार केले सील । Pune News
– धक्कादायक ! मैदानावर क्रिकेट खेळत असताना हार्ट अटॅक आल्याने मावळ तालुक्यातील क्रिकेटपटूचे निधन । Maval News
– शाब्बास आर्यन ! लोणावळ्याचा आर्यन दळवी गणित विषयात राज्यात प्रथम, अभिनंदनाचा होतोय वर्षाव । Lonavala News