लोणावळ्यातील एअरफोर्स स्टेशन ( Air Force station Lonavala ) या संवेदनशील परिसरात विनापरवाना ( Without License ) ड्रोन ( Drones ) उडवल्याबद्दल ( Flew ) आणि शूटींग केल्याबद्दल एका व्यक्तीवर लोणावळा शहर पोलिसांत ( Lonavla City Police ) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवार (13 नोव्हेंबर) रोजी सायंकाळी पाच वाजता ही घटना घडली. या प्रकरणी एअर फोर्स पोलिस नोहंमद अर्शद आलम (24) यांनी लोणावळा पोलिसांत फिर्याद दिली होती.
फिर्यादीवरुन पोलिसांनी, राहूल बालकृष्ण बडोले (वय 32 वर्षे, व्यवसाय – स्टेज डिझायनर, स.रा. बांद्रा इस्ट, मुंबई, मुळ रा. भंडारा) याच्याविरोधात भारती दंड संहिता कलम 188 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. ( Drones Flew Without License at Air Force station Lonavala )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
लोणावळा शहर परिसरात एअर फोर्स, आयएनएस शिवाजी ही केंद्राची संवेदनशील ठिकाणे आहेत. या ठिकाणी नेहमीच चोख बंदोबस्त असतो. तसेच, या ठिकाणी कोणतीही व्यावसायिक कृती करण्यास बंदी असते किंवा त्यासाठी पूर्वपरवानगी घ्यावी लागते. आरोपी राहूल बालकृष्ण बडोले याने ड्रोन द्वारे शूटींग करण्यापूर्वी जिल्हाधिकारी किंवा संबंधित विभागाची परवानगी घेतली नव्हती, ( Unlicensed Drones ) असे तक्रारदाराने फिर्यादीत नमूद केले आहे. त्यानुसार संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठांच्या आदेशानुसार पोलीस नाईक शिंदे हे करत आहेत.
अधिक वाचा –
– Video : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर खोपोलीजवळ बस आणि ट्रकचा भीषण अपघात, अनेक प्रवासी जखमी
– मावळ तालुक्यातील ‘या’ 9 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे बिगुल वाजले, थेट जनतेतून होणार सरपंचाची निवड