मावळ तालुका ( Maval Taluka ) हा भात पिकाचे ( Rice Crop ) आगार म्हणून ओळखला जातो. चालू वर्षी तालुक्यातील भात पीके जोमदार ( Rice Crop Grown Well ) आल्याचे दिसत आहे. कृषि विभाग ने ( Agriculture Department ) या वर्षीच्या खरीप हंगामात मे महिन्यापासूनच सुयोग्य नियोजन केले. गावोगावी जाऊन शेतकऱ्यांचे प्रशिक्षण घेऊन योग्य वाणाची निवड, बिजप्रक्रिया, गादी वाफ्यावर रोपवाटिका, चारसूत्री आणि एसआरटी लागवड याबाबत माहिती देऊन प्रकल्प, शेतीशाळा, प्रात्यक्षिक राबवून नवनवीन प्रयोग केले होते.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
कृषि विभागाच्या प्रत्यक्ष क्षेत्रीय पातळीवर केलेल्या कामाला आता यश मिळताना दिसत आहे. शेतकऱ्याचे उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने मावळ कृषि विभाग काम करत आहे. भात पिकावर कीड आणि रोग येण्यास सध्या वातावरण अनुकूल आहे. त्यामुळे मावळ कृषि विभागाने कीड आणि रोग येण्यापुर्वी शेतकऱ्यांना त्याची माहिती मिळावी ह्यासाठी शेतकऱ्यांना कीटकनाशक फवारणी संबंधी व्हॉट्सअप ग्रुप, वार्ताफलक, सभा घेऊन माहिती गावोगावी दिली जात आहे. ( Due To Agriculture Department Efforts Rice Crop Grown Well In Maval Taluka )
अधिक वाचा –
Video : आमदार दिलीप मोहिते पाटलांच्या हस्ते गणेश पाटील यांना ‘जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार’ प्रदान
मावळमधील ‘या’ गावात आढळले प्राचीन अवशेष, मानवी शरीराचे भाग आणि बरंच काही…