मावळ तालुक्यात ( Maval Taluka ) यंदा खरीप हंगाम 2022-23 मध्ये भातपिक ( Paddy Crop ) जोमदार आले आहे. तसेच मुख्य पावसाळ्यात आणि परतीच्या पावसातही भातपिकाची हानी झालेली नाही. तालुक्यातील अनेक विभागांत भातपिक सध्यस्थितीला उत्तम आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
मावळ कृषि विभागाने ( Agriculture Department Maval ) यावर्षी मे, जून महिन्यापासूनच खरीप हंगामाची तयारी केली होती. त्यासाठी गावोगावी, सभा मेळावे घेऊन शेतकऱ्यांना भात बियाणे निवड, बिजप्रक्रिया, भातरोपे गादीवाफ्यावर तयार करणे, चारसूत्री, एसआरटी पद्धतीने भात लागवड करणे, भातास युरिया ब्रिकेट वापरणे, किड आणि रोगासाठी कामगंध सापळे बसवणे, शेतीशाळा, प्रात्यक्षिक प्लॉट, क्रॉपसॅप योजने अंतर्गत कीड वा रोगाची निरीक्षण घेणे, शेतकऱ्यांना कीड आणि रोगाची माहिती देऊन कीटकनाशक फवारणीची माहिती देणे, कृषि वार्ता फलक, वृत्त पत्र, टीव्ही मीडिया द्वारे भातपिका विषयी जनजागृती करणे आदी उपक्रम राबवून सर्व कामे कृषि विभागाने केल्यामुळे त्याचे चांगले परिणाम तालुक्यात दिसत आहे. ( Due To Efforts Of Agriculture Department Rice Paddy Crop Are In Good Condition In Maval Taluka )
संपूर्ण तालुक्यात यंदा भात पीक जोमदार आलेले दिसत असून शेतात पीक डोलताना दिसत आहे, अशी माहिती विकास गोसावी (कृषि विभाग मावळ) यांनी दिली.
अधिक वाचा –
Video : सेल्फीचा मोह जीवावर बेतला, पवना नदीत बुडून तरुणाचा मृत्यू
पवनमावळमधील अनेक गावांत राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान भात पिक प्रकल्प अंतर्गत शास्त्रज्ञ भेट
पॉलिहाऊस उभारणीची मर्यादा किमान 5 एकर करावी, मावळमधील शेतकऱ्यांची केंद्रीय कृषिमंत्र्यांकडे मागणी