Dainik Maval News : काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्या सोनिया गांधी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बजाविलेल्या नोटिसीच्या विरोधात केंद्र सरकारचा निषेध म्हणून युवक काँग्रेसने लोणावळा-पुणे लोकल रोखून धरली.
नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना नोटीस दिल्याच्या निषेधार्थ युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी खडकी रेल्वे स्थानकावर लोणावळा-पुणे लोकल अडवली. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत तीव्र आंदोलनाचा इशारा दिला.
- ‘भाजपाकडून राजकीय सूडाची कारवाई आम्ही खपवून घेणार नाही. राहुल गांधी यांच्यावर खोट्या केसेस लावून त्यांना गप्प करण्याचा प्रयत्न हा लोकशाहीवर हल्ला आहे. देशात भाजपचा हुकूमशाही कारभार आम्ही चालू देणार नाही,’ असा इशारा राज्य कार्याध्यक्ष शिवराज मोरे, अक्षय जैन, शहराध्यक्ष सौरभ अमराळे यांनी दिला.
भारतीय जनता पक्षाने काँग्रेसच्या सर्वोच्च नेतृत्वाला लक्ष्य केले आहे. जनमानसातील त्यांची प्रतिमा खराब करण्याचा त्यांचा प्रयत्न सातत्याने सुरू आहे. त्यासाठी सरकारी यंत्रणाचा गैरवापर करण्यात येत आहे, अशी टीका राज्य कार्याध्यक्ष शिवराज मोरे यांनी केली.
- सरचिटणीस अक्षय जैन यांनी भाजपची ही मनमानी युवक काँग्रेस खपवून घेणार नाही, लोकशाहीवरील या हल्ल्याच्या निषेधार्थ युवक काँग्रेस रस्त्यावरून उतरून लढा देईल असे सांगितले.
या आंदोलनात प्रदेश सरचिटणीस प्रथमेश आबनावे, शहराध्यक्ष सौरभ अमराळे, तारीक बागवान, प्रवीण बिरादार, महेश म्हेत्रे, कौस्तुभ नवले, चैतन्य जायभाये, मतीन शेख, विक्रांत धोत्रे, राहुल शिंदे, अक्षय बहिरट, मुरली बुद्रराम, हर्षद हांडे सहभागी झाले होते.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचा 27वा गाळप हंगाम संपन्न ; 4 लाख 64 हजार पोती साखरेचे उत्पादन
– ‘मी 1 लाख 10 हजार मतांनी निवडून आलो, त्यामुळे आता 1 लाख 10 हजार झाडे लावणार’ ; आमदार शेळके यांचा संकल्प
– लोहगड किल्ल्याच्या विकासासाठी केंद्र सरकारकडून अडीच कोटींचा निधी ; खासदार श्रीरंग बारणे यांची माहिती । Lohgad Fort