तळेगाव येथील नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ आणि कै. अॅड. शलाका संतोष खांडगे चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने समर्थ शलाका शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षा घेण्यात आली होती. या स्पर्धेत आर्या गणेश आहिरे हिने प्रथम क्रमांक, कु स्नेहल विठ्ठल शिंदे हिने द्वितीय क्रमांक, कु पल्लवी संतोष ढमाले हिने तृतीय क्रमांक तर उत्तेजनार्थ शिष्यवृतीमध्ये कु. अक्षरा संजय गरुड या चार विद्यार्थ्यांनी टॉप फाईव्ह मध्ये स्थान मिळवले. यासह अकरावीमध्ये दिक्षा अबाजी तुपे या विद्यार्थ्यींनीने यश मिळवले. या सर्व विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेत श्री एकविरा विद्या मंदिर शाळेचा डंका वाजत दमदार कामगिरी केली. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
विद्यार्थ्यांना एन.एम.एम.एस. परीक्षा आणि शिष्यवृती परीक्षेत यशस्वी विद्यार्थी घडवणारे शिक्षक उमेश इंगुळकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. एनएमएमएस तसेच आठवी शिष्यवृती परिक्षेप्रमाणे समर्थ शलाका परीक्षेत देखील गेल्या अनेक वर्षांपासून एकविरा विद्यालयातील विद्यार्थांंचा बोलबाला कायम राहिला आहे. विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षेचा सराव व्हावा, परीक्षेची भीती दूर व्हावी, प्रोत्साहन मिळावे, शाळांच्या गुणवत्तेचा दर्जा सुधारावा, समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत शिक्षणाची संधी मिळावी या उद्देशांने समर्थ शलाका शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षा घेण्यात येते. (Ekvira Vidya Mandir Karla School Students Grand Success in Samarth Shalaka Scholarship Examination)
इयत्ता सातवी, अकरावी आणि नववीतील एकूण 1350 विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेस बसले होते. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष संजय भेगडे, सचिव संतोष खांडगे, शालेय समिती अध्यक्ष सोनबा गोपाळे, प्राचार्य संजय वंजारे, माजी सभापती शरद हुलावळे, माजी पं समिती सदस्य दिपक हुलावळे, सरपंच दिपाली हुलावळे, उपसरपंच किरण हुलावळे यांंच्यासह ग्रामपंचायत सदस्य आणि कार्ला ग्रामस्थांनी विद्यार्थांचे अभिनंदन केले.
अधिक वाचा –
– आरोग्य विभागातील 10 हजार 949 रिक्त पदांची भरती प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरू – आरोग्य मंत्री तानाजी सावंत
– मावळात खरेदी विक्री संघाच्या निवडणूकीतून दिसणार महायुतीची ताकद! 19 पैकी 10 जागा आधीच बिनविरोध । Maval Taluka Kharedi Vikri Sangh
– मोठी बातमी! कामशेतजवळील अवैध जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; 10 जण ताब्यात, 11 लाखांचा मुद्देमाल जप्त । Maval Crime News