वृद्ध व्यक्तीचे एटीएम कार्ड हातचलाखीने लंपास करत त्यातून 85 हजार 900 रुपये काढून घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दिनांक 17 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी साडेअकडा ते बारा वाजण्याच्या कालावधीत तळेगाव दाभाडे येथे हा प्रकार घडला. याप्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात ( Talegaon Dabhade Police ) फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुधीर सिताराम जोशी (वय 68 वर्षे, रा. मारुती मंदिर चौक, तळेगाव दाभाडे) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. ( Elderly Person Cheated In Talegaon Dabhade )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुधीर सीताराम जोशी हे शांताई सिटी, तळेगाव दाभाडे या ठिकाणी असलेल्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. त्यावेळी अज्ञात व्यक्तीने हातचलाखीने त्यांच्याजवळील एटीएम कार्ड स्वत:च्या ताब्यात घेतले आणि त्याच्याजवळील दुसरे कार्ड जोशी यांना दिले. त्यानंतर आरोपीने या एटीएम कार्ड मधून 35,000 रुपये विड्रॉल केले तर एकेठिकाणी 50,900 रुपयांचा व्यवहार केला. असे एकूण 85,900 रुपये या एटीएमच्या माध्यमातून वापरले. हा प्रकार जोशी यांच्या लक्षात येताच त्यांनी पोलिसात धाव घेतली.
अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे नगरपरिषदेकडून मालमत्ता कर वसुलीची धडक मोहीम, थकबाकीदारांना जप्तीचे वॉरंट
– मुळशी तालुक्यातील प्लस व्हॅली येथील खोल कुंडात बुडून 23 वर्षीय पर्यटकाचा मृत्यू