सोमवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही गटांनी सोपवलेल्या नावांच्या पर्यायांच्या यादीतून दोन्ही गटाला एक एक नाव दिले. त्यानुसार उद्धव ठाकरे गटाला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव मिळाले. तर एकनाथ शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव मिळाले. तसेच निवडणूक आयोगाने ठाकरे गटाने दिलेल्या चिन्हांच्या तीन पर्यायांपैकी त्यांना ‘मशाल’ हे चिन्ह दिले होते. परंतू, शिंदे गटाने दिलेले तीनही पर्याय बाद झाल्याने त्यांना चिन्ह मिळाले नव्हते, त्यामुळे त्यांना आज मंगळवारी पुन्हा पर्याय देण्यास सांगितले होते.
त्यानुसार एकनाथ शिंदे गटाच्या ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षाने ढाल-तलवार, तळपता सूर्य, पिंपळाचे झाड हे तीन पर्याय निवडणूक आयोगाकडे दिले होते. त्यावर आता केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय आला असून निवडणूक आयोगाने शिंदे गटाला, ‘ढाल – तलवार’ हे चिन्ह दिले आहे. ( Election Commission of India allots the Two Swords & Shield symbol to Eknath Shinde faction of Shiv Sena )
अधिक वाचा –