मावळ तालुक्यातील लांबणीवर पडलेल्या वाकसई ग्रुप ग्रामपंचायत निवडणुकीचे अखेर बिगुल वाजले आहे. वाकसई ग्रामपंचायतीच्या अकरा जागांसाठी येत्या डिसेंबर महिन्यात दिनांक 20 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. तर उमेदवारांना मंगळवार, दिनांक 28 नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. तर,वडगाव मावळ इथे दिनांक 21 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
लांबलेली निवडणुक अखेर होणार असल्याने इच्छुकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. इथेही सरपंचपदाची निवड थेट जनतेतून होणार असून, सरपंचपद नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेसाठी राखीव आहे. मावळातील 19 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूका आणि 10 ग्रामपंचायचींच्या पोटनिवडणूका नुकत्याच पार पडल्या. त्यानंतर आता तालुक्यातील फक्त एकाच ग्रामपंचायतीची निवडणूक होणार असल्याने सर्वांचे लक्ष याकडे लागून राहिले आहे. ( Election of Vakasai Gram Panchayat in Maval taluka announced )
चुकीचे आरक्षण काढल्याने आरक्षण बदलाबाबत वाकसईच्या काही ग्रामस्थांनी न्यायालयात धाव घेतल्याने वाकसईची निवडणूक लांबणीवर पडली होती. वाकसई ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया रखडल्याने इच्छुकांची धाकधूक वाढली होती. खर्च वाढत असल्याने उमेदवार धास्तावले होते. अखेर आयोगाच्या वतीने वाकसई ग्रुपग्रामपंचायतीच्या अकरा जागांसाठी 23 ऑक्टोबर रोजी नव्याने आरक्षण सोडत काढण्यात आली. अखेर निवडणूक प्रक्रिया मार्गी लागल्याने इच्छुकांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.
असा आहे निवडणूक कार्यक्रम
नामनिर्देशन दाखल करण्याचा दिनांक – 28 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर (स. 11 ते दु. 3)
अर्ज छाननी – 5 डिसेंबर
अर्ज माघारी – 7 डिसेंबर (दु. 3 पर्यंत)
चिन्ह वाटप व अंतिम यादी प्रसिद्धी – 7 डिसेंबर (दु. 3 नंतर)
मतदान – 20 डिसेंबर
मतमोजणी – 21 डिसेंबर
अधिक वाचा –
– बंगळुरुमधील सेवानिवृत्त अधिकाऱ्याची माळेगाव आश्रमशाळेला सदिच्छा भेट; विद्यार्थ्यांना 62 हजारांची मदत
– अवकाळीचा तडाखा! शेतकऱ्यांनी पंचनामे करुन घेण्यासाठी प्रशासनाशी संपर्क करावा – आमदार सुनिल शेळके
– शिळींब सोसायटीचे माजी चेअरमन शंकरराव धनवे यांचे दुःखद निधन! अंत्यविधीला जमला हजारोंचा जनसमुदाय