मावळ तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे भात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसत आहे. अचानक झालेल्या पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तात्काळ पंचनामे करावेत. एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, याची प्रशासनाने खबरदारी घ्यावी, असे निर्देश आमदार शेळके यांनी दिले आहेत. तसेच, अधिकाऱ्यांकडुन पंचनामे करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. तरीही ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यांनी तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क करुन पंचनामे करुन घ्यावेत, असे आवाहन आमदारांनी केले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार शुक्रवारी (दिनांक 10 नोव्हेंबर) राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस बरसला. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यालाही अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. तालुक्यातील अनेक भागात गुरुवार आणि शुक्रवार असा सलग दोन दिवस अवकाळी पाऊस कोसळला आहे. त्यातही शुक्रवारी झालेल्या जोरदार पावसाने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे आहे. शुक्रवारी पवनमावळ, आंदर मावळ, कामशेत, वडगाव मावळ, लोणावळा भागात सलग दोन ते तीन तास अवकाळी पाऊस बरसला. पावसामुळे या भागातील भात पिके आता संकटात आली आहे. सध्या खरीप हंगामातील भात पिक काढणीला आली आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी काढणी करून पिके शेतात ठेवली आहेत. त्यात आता अवकाळीचा तडाखा बसल्याने शेतकऱ्यांना हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाच्या अवकृपेने हिरावून नेण्याची भिती शेतकऱ्यांना सतावत आहे. ( unseasonal rain in maval taluka farmers should report damage appeal by mla sunil shelke )
अधिक वाचा –
– दिवाळीचा पहिला दिवा… शेकडो पणत्यांनी उजळला किल्ले लोहगड, डोळ्यांचे पारणे फेडणारे फोटो – पाहा
– करुंज गावातील ‘त्या’ तरुणाच्या हत्येचा उलगडा, पोलिसांकडून 3 आरोपी गजाआड
– कामाची बातमी! पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन; जाणून घ्या प्रक्रिया