वडगाव मावळ शहरात गुरूवार (दि. 16 मे) पासून विजेची समस्या सुरु आहे. अचानक वीज जाणे. तासनतास वीज गायब होणे. सतत वीज येणे – जाणे यासह रात्री अपरात्री विजपुरवठा खंडीत होणे, यामुळे वडगाव शहरातील नागरिक त्रस्त झाले आहे. मावळ तालुक्याचे मुख्यालय असलेल्या शहरातच महावितरणचा हा गलथान कारभार पाहता, आता त्याविरोधात राजकीय पक्षांनी आवाज उठवायला सुरुवात केली आहे. सोमवारी (दि. 20 मे) शहर भाजपाकडून महावितरणला याबाबत निवेदन देण्यात आले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
भारतीय जनता पार्टी, वडगाव मावळ शहर अध्यक्ष संभाजी म्हाळसकर यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने वडगाव येथील महावितरण कंपनी च्या उपविभागीय कार्यालयात जाऊन उपकार्यकारी अभियंता यांच्याकडे आपले निवेदन सादर केले. ( Electricity problem in Vadgaon Maval BJP letter to mahavitaran officers )
काय आहे निवेदन ?
“गुरुवार दिनांक 16 मे 2024 रोजी वडगांव शहरामध्ये मोठ्या प्रमाणात वादळी पाऊस झाला. त्यामुळे या परिसरात मोठी वित्तहानी झाली. अनेक घराचे पत्रे उडाले, झाडे उन्मळून पडली. गुरुवार दिनांक 16 मे पासून ते रविवार दिनांक 19 मे पर्यंत विज पुरवठ्याचा लपंडाव सुरु होता. गुरुवार दिनांक 16 मे रोजी सायंकाळी 5 वाजता वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर सुमारे 27 तासांच्या प्रदिर्घ कालावधी नंतर वीज पुरवठा शुक्रवारी दिनांक 17 मे च्या रात्री उशीरा सुरु झाला. वडगाव शहर हे तालुक्याचे मुख्यालय असल्याने ग्रामीण भागातील नागरिक त्यांची सरकारी कामे करण्यासाठी वडगावंमध्ये येत असतात.
परंतू गलथान कारभारामुळे त्याचा त्यांना नाहक व प्रचंड त्रास तालुक्यातील व वडगाव शहरातील ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, रुग्ण यांना होत आहे. आपल्या भोंगळ कारभारामुळे वीज नसल्याकारनांनी शासनाचा लाखो रुपयांचा महसूल देखील बुडाला आहे. वडगांव शहरामध्ये असणारे वीज वितरण कंपनीचे कर्मचारी वीज तक्रारीचे कामे तोंड पाहून करतात. अनेक नागरिकांचे फोन देखील उचलत नाही. त्यामुळे नागरिक मेटाकुटीला आले आहेत.
तरी आपणांस या निवेदनाद्वारे सुचित करण्यात येते की, वडगाव व कातवी शहरात वीज पुरवठा नियमित करणेकामी कार्यवाही करावी, अन्यथा पुढील 8 दिवसांत आपल्या कार्यलयावर वडगाव शहर नागरिक यांच्या वतीने धडक मोर्चा काढून आंदोलन करण्यात येईल. याची नोंद घ्यावी. त्याची सर्वस्वी जबाबदारी आपलेवर राहील.”
अधिक वाचा –
– अवकाळी पावसात हायमास्ट दिव्यांची पडझड, वडगाव राष्ट्रवादीचे नगरपंचायत प्रशासनाला निवेदन । Vadgaon Maval
– मोठी बातमी ! इराणचे अध्यक्ष इब्राहीम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू, संपूर्ण देशावर शोककळा । Iran President Ebrahim Raisi Helicopter Crash
– अखेर वडगाव नगरपंचायत प्रशासन जागं झालं ! शहरातील सर्व होर्डींगची केली पाहणी, अनधिकृत होर्डिंग धारकांवर होणार कारवाई