Dainik Maval News : तालुक्याचे ठिकाण असलेल्या वडगाव मावळ शहरात सातत्याने वीज पुरवठा खंडित होत आहे. याचा त्रास स्थानिक व्यवसायिक आणि सामान्य नागरिक अशा सर्वांनाच होत आहे. मागील काही दिवसांपासून शहरात कुठल्याही पर्वसूचनेशिवाय तासनतास वीज पुरवठा खंडित होत आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील जागरुक नागरिकांनी शुक्रवारी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या वडगाव कार्यालयात भेट दिली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
वडगाव शहरातील महावितरण संबंधित असलेल्या विविध समस्या संदर्भात ही भेट घेण्यात आली. वारंवार लाईट जाणे, विविध ठिकाणी तारा तुटणे, ग्रामीण भागात डीपी चोरीला जाणे, फ्युज जाणे आदी समस्यांची मांडणी यावेळी करण्यात आली. ( Electricity supply is continuously interrupted in Vadgaon Maval city )
वडगाव शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांना विजेच्या समस्यांना वारंवार तोंड द्यावे लागत असल्याची तक्रार महावितरणचे उपकार्यकारी अभियंता परदेशी यांच्याकडे करण्यात आली. यावर येत्या काळात ह्या सर्व अडचणी दूर होतील, त्याअनुषंगाने काम सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी राजेश बाफना, खंडूशेठ भिलारे, अतुल राऊत, विशाल वहिले, सोमनाथ धोंगडे उपस्थित होते.
अधिक वाचा –
– वडगाव येथे सकल हिंदू समाज मावळ यांचा ‘हिंदू जन आक्रोश मोर्चा’ । Vadgaon Maval
– मुंबईतील गोविंदा पथकाने फोडली ‘मावळ गर्जना’ प्रतिष्ठानची दहीहंडी । Vadgaon Maval
– सोशल मीडियावर बदनामी केल्याप्रकरणी संतोष भेगडे यांची पोलिसांत धाव, तक्रार अर्जात अनेकांची नावे । Talegaon Dabhade