व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, September 25, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

सोशल मीडियावर बदनामी केल्याप्रकरणी संतोष भेगडे यांची पोलिसांत धाव, तक्रार अर्जात अनेकांची नावे । Talegaon Dabhade

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तळेगावचे शहराध्यक्ष संतोष भेगडे यांनी सोशल मीडियावर आपली बदनामी होत असल्याची तक्रार तळेगाव दाभाडे पोलिसांत दिली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
August 30, 2024
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, मावळकट्टा, शहर
Santosh Bhegde

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तळेगावचे शहराध्यक्ष संतोष भेगडे यांनी सोशल मीडियावर आपली बदनामी होत असल्याची तक्रार तळेगाव दाभाडे पोलिसांत दिली आहे. समाज माध्यमांवर फोटोंसोबत छेडछाड करुन खोट्या आशयाचा मजकूर प्रसिद्ध करून आपली बदनामी केली असल्याची तक्रार माजी नगरसेवक संतोष मारुती उर्फ छबुराव भेगडे यांनी तळेगाव दाभाडे पोलिसांकडे केली आहे. बदनामी करून आपले सामाजिक, राजकीय व आर्थिक नुकसान करण्याचा हेतू यातून स्पष्ट होत असल्याचे भेगडे यांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारअर्जात म्हटले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर ) 

काय म्हटलंय अर्जात ?
आपण बांधकाम व्यवसायिक असून राजकीय क्षेत्रात कार्यरत आहोत. तळेगाव नगरपरिषदेत नगरसेवक म्हणून काम करण्यासोबत पक्षाने विविध पदे दिली आहेत. सर्वकाही चांगले सुरू असताना काही व्यक्तींकडून आपली समाजमाध्यमांवर बदनामी होत असल्याचे कुटुंबातील व्यक्ती आणि समर्थकांकडून समजले. आपली बदनामी करण्याच्या हेतूने फोटोत छेडछाड करून बदनामीकारक मजकूर छापला आहे. असे संतोष भेगडे यांनी तळेगाव दाभाडे पोलिसांकडे केलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे. सोबत अर्जात काही व्यक्तींची नावे देखील त्यांनी नमूद केली आहेत.

गुन्हे दाखल करण्याची मागणी
सामाजिक बदनामी करण्याच्या हेतूने आणि व्यवसायात अडचणी निर्माण होण्याकरिता ही बदनामी समाजमाध्यमातून होत असून सदर षडयंत्रात सामील असणाऱ्यांवर सायबर क्राइम कायदा आणि भारतीय न्याय संहितेनुसार कारवाई करावी. तसेच बदनामी केल्याप्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी संतोष मारुती उर्फ छबुराव भेगडे यांनी तक्रार अर्जातून केली आहे.

कोण आहेत संतोष भेगडे?
संतोष मारुती उर्फ छबुराव भेगडे हे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात पीएमआरडीए चे सदस्य आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तळेगाव दाभाडे शहराचे ते शहराध्यक्ष आहेत. यासह तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे ते माजी नगरसेवक आहेत. यासह विविध सामाजिक संघटनांवर ते सध्या काम करत आहेत. ( Complaint of Santosh Bhegde to Talegaon Dabhade Police for defamation on social media )

अधिक वाचा –
– पंचायत समिती मावळच्या शिक्षण विभागामार्फत तळेगावात तालुकास्तरीय प्रज्ञाशोध कार्यशाळा संपन्न । Maval News
– तळेगाव नगरपरिषदेकडून शहरातील नोंदणीकृत 378 दिव्यांग लाभार्थींना अनुदानाचे वाटप । Talegaon Nagar Parishad
– रेड्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू, मावळातील कुसगाव येथील घटना, कुटुंबीयांना शोक अनावर । Maval News


dainik maval jahirat

Previous Post

‘त्याच ठिकाणी पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्यदिव्य पुतळा उभारणार’, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्धार

Next Post

मुंबईतील गोविंदा पथकाने फोडली ‘मावळ गर्जना’ प्रतिष्ठानची दहीहंडी । Vadgaon Maval

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Maval Garjana Pratishthan Dahihandi Festival Vadgaon Maval

मुंबईतील गोविंदा पथकाने फोडली 'मावळ गर्जना' प्रतिष्ठानची दहीहंडी । Vadgaon Maval

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

Talegaon Dabhade : निवडणूक आचारसंहितेमुळे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा पुन्हा स्थगित

September 23, 2026
Shirgaon-Parandwadi police seized DJ systems of two Ganesh Mandals from Chandkhed and Ozarde

“आवाज वाढव डीजे” भोवलं… शिरगाव पोलिसांनी दोन मंडळांचे डीजे केले जप्त

September 22, 2026
PHOTOS scene of propylene gas tanker accident on Mumbai-Pune Expressway

PHOTOS : मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरील प्रोपोलीन गॅस टँकर दुर्घटनेचा देखावा ठरतोय जनजागृतीचे माध्यम!

September 22, 2026
Omkar Thakar from Yelse village won gold medal by securing first place at taluka-level wrestling competition held at Urse

उर्से येथील तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसे गावचा ओंकार ठाकर याची प्रथम क्रमांक पटकावित सुवर्णपदकाची कमाई

September 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.