Dainik Maval News : मालवण तालुक्यातील राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याच्या दुर्दैवी घटनेसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा शासकीय निवासस्थानी बैठक घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ई – उपस्थित तर मंत्री रवींद्र चव्हाण, मंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव सुजाता सौनिक आदी उपस्थित होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर त्याच ठिकाणी पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यासाठीच्या कामाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गती दिली आहे. यासंदर्भात त्यांनी शिल्पकार विनय वाघ आणि शशिकांत वडके यांची भेट घेऊन त्यांची मते जाणून घेतली आहेत. राजकोट, मालवण येथील दुर्घटनेनंतर शासनाने दोन तांत्रिक समित्या स्थापन करण्याची अधिसूचना जाहीर केली आहे. दुर्घटनेची जबाबदारी निश्चित करण्यासाठी तसेच त्याच जागी नवीन पुतळा उभारण्यासाठी समित्या गठित करण्यात आल्या आहेत. ( Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse new statue at Malvan Rajkot itself said CM Eknath Shinde )
पुतळा कोसळण्यामागची कारणे शोधणे व या दुर्दैवी घटनेसंदर्भात विस्तृत कारणमीमांसा करण्यासाठी स्थापत्य अभियंते, तज्ज्ञ, आयआयटी तसेच नौदलाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेली एक तांत्रिक संयुक्त समिती नेमण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. शिवरायांच्या कर्तृत्वास व लौकीकास साजेसा भव्य आणि अत्युत्कृष्ट पुतळा उभारण्याच्या दृष्टीने देशातील उत्तम शिल्पकार, स्थापत्य अभियंते, तज्ज्ञ, नौदलाचे अधिकारी यांची एक समितीही सार्वजनिक बांधकाम विभागाने नेमावी. उभारल्या जाणाऱ्या पुतळ्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
अधिक वाचा –
– पंचायत समिती मावळच्या शिक्षण विभागामार्फत तळेगावात तालुकास्तरीय प्रज्ञाशोध कार्यशाळा संपन्न । Maval News
– तळेगाव नगरपरिषदेकडून शहरातील नोंदणीकृत 378 दिव्यांग लाभार्थींना अनुदानाचे वाटप । Talegaon Nagar Parishad
– रेड्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू, मावळातील कुसगाव येथील घटना, कुटुंबीयांना शोक अनावर । Maval News