व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, September 25, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

कान्हे शाळेत बाल गोविंदांनी फोडली दहीहंडी, राधा – कृष्ण यांच्या वेशभूषेत आलेल्या विद्यार्थ्यांनी वेधले सर्वांचे लक्ष

सालाबादप्रमाणे यावर्षी देखील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक केंद्र शाळा कान्हे याठिकाणी सुंदर नियोजन करून "दहिहंडी उत्सव" साजरा करण्यात आला.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
August 28, 2024
in लोकल, ग्रामीण
Bal Govinda broke Dahi Handi in Kanhe school Maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : श्री कृष्ण जन्माष्टमी निमित्ताने सालाबादप्रमाणे यावर्षी देखील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक केंद्र शाळा कान्हे याठिकाणी शाळा व्यवस्थापन समितीच्या पुढाकाराने सुंदर नियोजन करून “दहिहंडी उत्सव” साजरा करण्यात आला. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहाने दहिहंडीचा कार्यक्रम घेण्याबाबत शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष समीर सातकर, उपाध्यक्षा रेणूका सातकर तसेच सदस्य आरती भाळवणे, स्वप्नाली आरोटे व इतर सर्व सदस्यांनी शाळेच्या मुख्याध्यापिका सुकेशिनी कोले यांच्याशी चर्चा करुन नियोजन केले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर ) 

त्याप्रमाणे शाळेतील सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहभागातून सर्व विद्यार्थ्यांना राधा, कृष्णाच्या सुंदर वेशात नटूनथटून येण्यासाठी सुचना दिलेल्या होत्या. त्याप्रमाणे प्रत्येक वर्गातून बहुतेक मुलेमुली छान रंगीत कपडे परिधान करुन मुले “कृष्ण “आणि सुंदर साड्या नेसून मुली “राधा “बनून आलेल्या होत्या. शाळा आणि व्यवस्थापन समितीकडून प्रत्येक वर्गाला बक्षिसे जाहीर करण्यात आलेली होती.

ढोल ताशा आणि दहाहंडीच्या गाण्याचा तालावर पहिली ते सातवीच्या सर्व विद्यार्थ्यांना थर लावण्याची संधी देण्यात आली. यात मुलींनीही मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी दहिहंडी फोडण्यात बाजी मारत प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळवले. इयत्ता सातवीतील पियूश सातकर याने वर्गाच्या वतीने बक्षिसाचा स्वीकार केला. शाळेतील सर्व मुलामुलींनी आजच्या दहिहंडी उत्सवाचा मनमुराद आनंद नाचून बागडून साजरा केला.

सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यात शाळेच्या मुख्याध्यापिका कोले, नवले सर, सांगळे सर, काळडोके सर, वाव्हळ मॅडम, गाढवे मॅडम, बारवे मॅडम, श्रीमती मधे मॅडम, रणदिवे मॅडम यांनी सहकार्य केले. तर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष समीर सातकर, सदस्य कोंडीबा सातकर, सचिन वीरकर, उपाध्यक्षा रेणूका सातकर, आरती भाळवणे, स्वप्नाली आरोटे, कुंदा चौरे, नंदिता दास, पूजा जांभूळकर, रोहिणी वाघमारे आणि पालक महिलांनी पुढाकाराने सर्व नियोजन करुन संपूर्ण कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी विशेष मेहनत घेतली.

शाळेतील सहशिक्षक खंडू शिंदे यांनी कार्यक्रमाचे संपूर्ण चित्रीकरण आणि फोटोसेशन केले. दादासाहेब खरात यांनी सर्व विद्यार्थी, पालक आणि आयोजक-संयोजकांचे मनापासून आभार मानले.

अधिक वाचा –
– पंचायत समिती मावळच्या शिक्षण विभागामार्फत तळेगावात तालुकास्तरीय प्रज्ञाशोध कार्यशाळा संपन्न । Maval News
– तळेगाव नगरपरिषदेकडून शहरातील नोंदणीकृत 378 दिव्यांग लाभार्थींना अनुदानाचे वाटप । Talegaon Nagar Parishad
– रेड्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू, मावळातील कुसगाव येथील घटना, कुटुंबीयांना शोक अनावर । Maval News


dainik maval jahirat

Previous Post

जय शिवराय… कामशेत शहरात उभारला जाणार छत्रपती शिवरायांचा भव्यदिव्य अश्वारूढ पुतळा, ग्रामसभेत ठराव । Kamshet News

Next Post

‘त्याच ठिकाणी पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्यदिव्य पुतळा उभारणार’, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्धार

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse

'त्याच ठिकाणी पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्यदिव्य पुतळा उभारणार', मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्धार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

Talegaon Dabhade : निवडणूक आचारसंहितेमुळे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा पुन्हा स्थगित

September 23, 2026
Shirgaon-Parandwadi police seized DJ systems of two Ganesh Mandals from Chandkhed and Ozarde

“आवाज वाढव डीजे” भोवलं… शिरगाव पोलिसांनी दोन मंडळांचे डीजे केले जप्त

September 22, 2026
PHOTOS scene of propylene gas tanker accident on Mumbai-Pune Expressway

PHOTOS : मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरील प्रोपोलीन गॅस टँकर दुर्घटनेचा देखावा ठरतोय जनजागृतीचे माध्यम!

September 22, 2026
Omkar Thakar from Yelse village won gold medal by securing first place at taluka-level wrestling competition held at Urse

उर्से येथील तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसे गावचा ओंकार ठाकर याची प्रथम क्रमांक पटकावित सुवर्णपदकाची कमाई

September 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.