देशातील नागरिकांचे आरोग्य सुधारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजना सुरु केली आहे. या योजनेद्वारे दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना 5 लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा दिला जातो. योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना पॅनेलीकृत रुग्णालयांद्वारे 5 लाख रुपयांपर्यंतचे मोफत आरोग्य उपचार दिले जातील. परंतू अद्यापही ग्रामीण भागात या योजनेचा म्हणावा तसा प्रसार झालेला नाही. त्यामुळे वेहेरगाव (ता. मावळ) येथे भाजपाच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा सायली बोत्रे आणि प्रदेश सचिव जितेंद्र बोत्रे यांच्या माध्यमातून मोफत ‘आयुष्यमान भारत कार्ड’ शिबिर घेण्यात आले होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
वेहेरगाव येथे पार पडलेल्या या शिबिराला नारिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. एकूण 150 नागरिकांनी शिबिराचा लाभ घेत, आयुष्यमान कार्डकरिता नोंदणी केली. ‘आयुष्मान भारत गोल्डन कार्डद्वारे आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिक रुग्णालयात जाऊन 5 लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत मिळवू शकतात. आजच्या शिबिराला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळा आहे. यापुढेही असे शिबिर घेतले जातील’ असे सायली बोत्रे यांनी सांगितले. (Enrollment Camp for Health Card of Ayushman Bharat Yojana at Vehergaon Karla)
ह्यावेळी वेहेरगाव ग्रामपंचायत सदस्या पूजा पडवळ, अनिल गायकवाड, दत्तात्रय पडवळ, संतोष रसाळ आणि भाजपा प्रदेश सचिव जितेंद्र बोत्रे, मावळ भाजपा उपाध्यक्ष मधुकर पडवळ, कल्याणी ठाकर, सीमा आहेर, शिवसेना उपविभाग प्रमुख कैलास पडवळ, ज्ञानेश्वर बोत्रे, निवृत्ती बोत्रे, पांडुरंग बोत्रे, सोमनाथ बोत्रे यांसह ग्रामस्थ आणि लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अधिक वाचा –
– ‘पुणे रिंग रोडमुळे विकासाच्या नवीन संधी निर्माण होणार; खोपोली ते खंडाळा मिसिंग लिंकमुळे वाहतूकीचे प्रश्न सुटणार’ – देवेंद्र फडणवीस
– श्रीक्षेत्र भंडारा डोंगर येथे गाथा पारायण सोहळा आणि अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन; पाहा संपूर्ण नियोजन
– ‘दुर्घटनेशी आमचा संबंध नाही’, आळंदीजवळील सोळू गावातील अग्नीतांडवाबाबत महावितरणचे स्पष्टीकरण, वाचा । Pune News