व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, June 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘पुणे रिंग रोडमुळे विकासाच्या नवीन संधी निर्माण होणार; खोपोली ते खंडाळा मिसिंग लिंकमुळे वाहतूकीचे प्रश्न सुटणार’ – देवेंद्र फडणवीस

पुणे रिंगरोड महत्वाचा असून त्यासाठी 80 टक्के भूसंपादनापर्यंत पूर्ण होत आहे. येत्या काळात या मार्गाचे काम सुरु करण्यात येणार आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 9, 2024
in ग्रामीण, पुणे, शहर
Devendra-Fadnavis

Photo Courtesy : Team Dainik Maval


पुणे चक्राकार मार्गामुळे (पुणे रिंग रोड) पुणे, पिंपरी-चिंचवड, पीएमआरडीए क्षेत्रात विकासाच्या नवीन संधी तसेच अडीच लाख कोटी रुपयांची अर्थव्यवस्था नव्याने निर्माण होणार आहे. हा मार्ग येत्या काळात पुण्याच्या विकासाचे ते इंजिन ठरेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील ससून रुग्णालय चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांकरीता नूतन निवासी इमारत, महात्मा गांधी पूलगेट बसस्थानकाचे आधुनिकीकरण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसराचा विकास, संगम घाटावरील संगमेश्वर गणेश विसर्जन घाटनुतनीकरण व नागरिकांसाठी निवारा केंद्र, आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बॉटनिकल उद्यानाच्या भूमिपूजन प्रसंगी फडणवीस बोलत होते. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार भीमराव तापकीर, माधुरी मिसाळ, सिद्धार्थ शिरोळे, सुनील कांबळे, माजी मंत्री दिलीप कांबळे, माजी खासदार संजय काकडे, माजी आमदार योगेश मुळीक, योगेश टिळेकर, माजी महापौर मुरलीधर मोहोळ आदी उपस्थित होते. (Devendra Fadnavis Pune Visit Talk About Pune Ring Road and
Khopoli Khandala Missing Link)

फडणवीस म्हणाले, ‘पुणे रिंगरोड महत्वाचा असून त्यासाठी 80 टक्के भूसंपादनापर्यंत पूर्ण होत आहे. येत्या काळात या मार्गाचे काम सुरु करण्यात येणार आहे. आयटीपार्कच्या भागात आस्थापनांपर्यत जाण्यासाठी मेट्रोला जोडून स्कायबस सुरू करण्यात येणार असून येत्या काळात भूमीपूजन करण्यात येणार आहे. यामुळे आस्थापनांपर्यंत जाण्यासाठी वाहनाची आवश्यकता लागणार नाही आणि प्रदुषण होणार नाही. वाहतूक नियोजनासाठी मेट्रोला कनेक्टिव्हिटी देण्याचे काम करण्यात येणार आहे. खोपोली ते खंडाळा दरम्यान 9 किमी मिसिंग लिंकचे काम करण्यात येत असून यामुळे मुंबई-ते पुणे दरम्यान अंतर कमी होऊन वाहतुकीचे प्रश्न सुटणार आहे.’

पुणे शहरासाठी विविध योजना –
पुणे शहरात 24 X 7 पाणी पुरवठा योजना, नदी सुधार कार्यक्रम यासारख्या विविध प्रकारच्या योजना राबवून विकास कामांच्या माध्यमातून शहराचे चित्र बदलण्याचे काम सुरु आहे. पीएमपीएलच्या माध्यमातून देशातील पहिली इलेक्ट्रीक बसची फ्लिट पुणे शहरात केली आहे. पुण्याचे या मॉडेलची देशात अंमलबजावणी करण्यात येत असून विविध शहराने ते स्वीकारले आहे. मेट्रोचे कामे अतिशय गतीने करण्यात येत आहे. सिव्हील कोर्ट ते स्वागेट मेट्रोचे मुठा नदीच्या गर्भातून भुयारी चाचणी घेण्यात आली असून येत्या काळात मेट्रोचे तीन्ही मार्ग मिळून एकूण 54 कि.मीचे मेट्रोचे जाळे सुरु करण्यात येत आहे. येत्या वर्षभरात टाटाच्या मेट्रोचे काम पूर्ण करण्यात येणार आहे.

अधिक वाचा –
– मावळात ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाला नागरिकांचा विक्रमी प्रतिसाद! 4 दिवसात 7 हजार लाभार्थी, आमदार शेळकेंचे ग्राउंडवर काम
– महत्वाची बातमी! राज्यात पूर्व प्राथमिक ते इयत्ता 4 थी पर्यंतच्या शाळा सकाळी 9 नंतर भरणार, सरकारच्या सुचना, वाचा सविस्तर
– महाराष्ट्र पुन्हा हादरला! ठाकरेंचे माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्या मुलावर लाईव्ह व्हिडिओ दरम्यान गोळीबार, उपचारादरम्यान मृत्यू


Previous Post

श्रीक्षेत्र भंडारा डोंगर येथे गाथा पारायण सोहळा आणि अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन; पाहा संपूर्ण नियोजन

Next Post

ठाकरे गटाने फुंकले लोकसभा निवडणूकीचे रणशिंग! ‘मावळची जागा जिंकायचीच’, पदाधिकाऱ्यांचा वडगावमधील आढावा बैठकीत निर्धार । Vadgaon Maval

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
shiv-sena-maval-taluka-loksabha

ठाकरे गटाने फुंकले लोकसभा निवडणूकीचे रणशिंग! 'मावळची जागा जिंकायचीच', पदाधिकाऱ्यांचा वडगावमधील आढावा बैठकीत निर्धार । Vadgaon Maval

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Crackdown on unauthorized night camping in Shirota forest area of ​​Maval two arrested

मावळातील शिरोता वनक्षेत्रात विनापरवानगी नाईट कॅम्पिंगवर धडक कारवाई ; दोन खासगी कंपन्यांचे प्रतिनिधी अटकेत

June 1, 2026
Fatal accident on Mumbai-Pune Expressway Two dead on the spot three injured

Mumbai Pune Expressway Accident । मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात ; दोघांचा जागीच मृत्यू, तिघे जखमी

June 1, 2026
Pavana Dam

Pawana Dam : जलसंपदा मंत्र्यांच्या आश्वासनालाही वर्ष उलटले ; पवना धरणाचे मजबुतीकरण तब्बल १९ वर्षांपासून रखडले

May 31, 2026
Big relief for students Deadline to submit marksheet and school leaving certificate for 11th admission

विद्यार्थ्यांना मोठा दिलासा ! अकरावी प्रवेशासाठी गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्यास मुदत

May 31, 2026
youth who went for swimming in Pawana river near Parandavadi bridge in Maval taluka died

मावळ तालुक्यातील परंदवडी पुलाजवळ पवना नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोघांपैकी एकाचा बुडून मृत्यू

May 31, 2026
internationally renowned wildlife photographer Abhay Kewat from Maval Completed 1006 birds photograph

मावळातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वन्यजीव छायाचित्रकार अभय केवट यांचा भीमपराक्रम ! १००६ पक्ष्यांचे छायाचित्रीकरण केले पूर्ण

May 30, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.