Dainik Maval News : 204 मावळ विधानसभा मतदारसंघात आज मतदान होत आहे. राज्यातील सर्वच अर्थात 288 विधानसभा मतदारसंघात आज मतदान पूर्ण होत आहे. मावळ विधानसभा क्षेत्रात एकूण 402 मतदान केंद्र असून सर्व ठिकाणी सुरळीत मतदान प्रक्रिया सुरु असल्याची माहिती निवडणूक कार्यालयाकडून देण्यात आली.
दुपारी तीन वाजेपर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मावळ विधानसभा मतदारसंघात एकूूण 1 लाख 92 हजार 123 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी सुरेंद्र नवले यांनी दिलेल्या माहितीनुसार, मावळ विधानसभा मतदारसंघात सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत एकूण 49.75 टक्के मतदान झाले आहे.
204 मावळ मतदारसंघात एकूण मतदार संख्या ही 3 लाख 86 हजार 172 इतकी आहे. त्यात 1 लाख 97 हजार 436 पुरुष मतदार असून 1 लाख 88 हजार 723 महिला मतदार असून इतर मतदार 13 आहेत. यापैकी दुपारी 3 वाजेपर्यंत 5.50 टक्के पुरुष मतदारांनी अर्थात एकूण 99 हजार 696 पुरुष मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तर 48.87 टक्के मतदारांनी अर्थात 92 हजार 426 महिला मतदारांनी मतदान केले.
एकूण 3 लाख 86 हजार 172 मतदारांपैकी 1 लाख 92 हजार 123 मतदारांनी मावळात दुपारी 3 पर्यंत मतदान केले असून जवळपास 50 टक्के मतदान झाले आहे. यंदा मावळात मतदारांमध्ये मतदानाचा उत्साह पाहायला मिळत आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मोठी बातमी : वेहेरगाव तलावात एक जण बुडाला ; शिवदुर्ग रेस्कू टीमला मृतदेह शोधण्यात यश । Maval Crime
– ‘कामाला का गेला नाही?’ वडिलांनी जाब विचारल्याने मुलाची आत्महत्या, दारूच्या नशेत टोकाचे पाऊल । Dehu News
– साजगावच्या यात्रेवरुन परत जाताना युवकांच्या दुचाकीचा अपघात ; दोन युवकांचा मृत्यू, एक जखमी । Khopoli News