Dainik Maval News : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत 22 फेब्रुवारी 2026 रोजी आयोजित शिष्यवृत्ती परीक्षेसाठी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याकरिता 8 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती परीक्षा परिषदेमार्फत देण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता पाचवी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता आठवी) दि. 22 फेब्रुवारी 2026 रोजी सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेकरिता शाळा नोंदणी व विद्यार्थी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याकरिता 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र आता 8 डिसेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
ज्या शाळांनी अद्याप ऑनलाईन आवेदनपत्र भरले नसतील त्यांनी नियमित शुल्कासह 8 डिसेंबरपर्यंत शाळा माहिती प्रपत्र, आवेदनपत्र आणि शुल्क ऑनलाईन भरावयाचे आहे. विलंब शुल्कासह 15 डिसेंबर, अतिविलंब शुल्कासह 23 डिसेंबर तर अति विशेष विलंब शुल्कासह 31 डिसेंबर 2025 पर्यंत ही माहिती भरता येईल. त्यानंतर कोणत्याही परिस्थितीत ऑनलाईन अथवा ऑफलाईन पद्धतीने आवेदनपत्र भरता येणार नाही, असेही परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी कळविले आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– राज्यातील सर्व नगरपंचायत, नगरपरिषदांची मतमोजणी २१ डिसेंबरला होणार ; काय आहे नागपूर खंडपीठाचा आदेश? वाचा सविस्तर
– तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट ! सहा जागांवरील निवडणूक स्थगित, ‘हे’ आहे कारण
– कुसगांव बुद्रुक – काले जिल्हा परिषद गटात दत्तात्रय उर्फ भाऊसाहेब गुंड यांचा गावभेट दौरा उत्साहात सुरू
– कार्ला-खडकाळा जिल्हा परिषद गट : आशाताई वायकर यांचा शिलाटणे गावभेट दौरा उत्साहात


