Dainik Maval News : देहूरोड येथे वर्गणीच्या नावाखाली एका व्यक्तीने देहूरोड मेन बाजार मधील व्यापाऱ्यांकडून खंडणी वसूल केली. याप्रकरणी पोलिसांनी खंडणी वसूल करणाऱ्या एकाला अटक केली आहे. ही घटना 11 आणि 12 एप्रिल रोजी घडली.
- राजू मासलामनी पिल्ले उर्फ राजा पिल्ले (वय 35, रा. गांधीनगर झोपडपट्टी, देहूरोड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी कापड व्यावसायिक प्रशांत अमृतलाल कटारिया यांनी रविवारी (दि. 13) देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कटारिया यांचे देहूरोड मेन बाजार येथे कपड्यांचे दुकान आहे. राजा पिल्ले याने आंबेडकर मित्र मंडळ या नावाच्या प्रत्येकी 501 रुपयांच्या दोन पावत्या कटारिया यांना दिल्या. तसेच कटारिया यांच्या दुकानात येऊन एक हजार रुपयांची मागणी केली.
- कटारिया यांच्या चुलत्यांनी आरोपीला पाचशे रुपये दिले असता त्याने ‘तुम्हाला इथे धंदा करणे मुश्किल करून टाकेल. तुम्हाला कायमचे संपवून टाकीन’ अशी धमकी देत खंडणी मागून पैसे घेतले.
आरोपी पिल्ले याने त्याचे मंडळ रजिस्टर नसताना तसेच कोणतेही अधिकार पत्र नसताना देहूरोड मेन बाजारातील इतर व्यापाऱ्यांकडून देखील धमकी देऊन खंडणी वसूल केली असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. देहूरोड पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत महाराष्ट्रातील 132 रेल्वे स्थानकांचा होणार कायापालट ; पाहा रेल्वे स्थानकांची यादी व मंजूर निधी
– सोमाटणे फाटा येथील कोंडी सोडविण्यासाठी पीएमआरडीएच्या जागेत रस्त्यांचे रुंदीकरण करावे – खासदार श्रीरंग बारणे
– ना दाखला ना कुठली सेवा मिळणार ; थकबाकीदारांवर वडगाव नगरपंचायत करणार कठोर कारवाई । Vadgaon Maval