Dainik Maval News : मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते विजय कदम यांचे आज, शनिवार 10 ऑगस्ट रोजी दुःखद निधन झाले आहे. विजय कदम हे मागील दीड वर्षांपासून गंभीर आजाराशी लढा देत होते. दरम्यान त्यांच्यावर उपचार सुरू असताना शुक्रवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. मराठी सिनेसृष्टीत आपल्या दर्जेदार अभिनयाची छाप सोडणाऱ्या कलावंताच्या जाण्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
विजय कदम यांच्या पार्थिवावर आज दुपारी दोन वाजता अंधेरी येथील स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे सकाळी अंधेरी येथील राहत्या घरी निधन झाले. निधनसमयी त्यांचे वयवर्षे 67 होते. त्यांच्या मागे पत्नी आणि एक मुलगा असा परिवार आहे. अभिनेत कदम यांच्या पार्थिवावर अंधेरी – ओशिवरा येथील स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. ( Famous Marathi actor Vijay Kadam passed away )
अभिनेते विजय कदम यांचे गाजलेले चित्रपट –
विजय कदम यांनी मराठी चित्रपट, मालिका, आणि नाटकांमधून कामे केली. खुमखुमी, टूरटूर, पोलीस नामा यासारख्या नाटकांत त्यांनी काम केले. परंतु त्यांची इच्छा माझी इच्छा माझी पुरी करा या लोकनाट्यातील भूमिका आजही रसिकांच्या लक्षात आहे. हळद रुसली कुंकू हसलं, लावू का लाथ, चष्मे बहादुर यासारख्या अनेक चित्रपटात त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला.
अधिक वाचा –
– कुणी जागा देतं का जागा ? घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी टाकवे ग्रामस्थांना जागेची अडचण, निधी आहे पण…
– क्रांती दिनी, भिडले राजकारणी ; श्रद्धांजलीच्या पावसात, राजकारण जोरात
– तयारी विधानसभा निवडणूकीची : संपूर्ण पुणे जिल्ह्यात ८४ लाख मतदार ; पाहा जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभेतील मतदारसंख्या । Vidhansabha Election 2024