Dainik Maval News : टाकवे बुद्रुक येथे ग्रामपंचायत मार्फत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी 20 लाख रुपये निधी उपलब्ध आहे. परंतु जागे अभावी हा प्रकल्प रखडला असल्याने या प्रकल्पासाठी कुणी जागा देत जागा, अशी म्हणण्याची वेळ ग्रामपंचायतींवर आली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
सदर प्रकल्पासाठी एकुण 20 गुंठे जागेची आवश्यकता आहे. प्रकल्पासाठी जागा उपलब्ध व्हावी, यासाठी ग्रामपंचायत पदाधिकारी आणि ग्रामस्थांची नुकतीच बैठक संपन्न झाली. यामध्ये ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब मतकर यांनी उपलब्ध असलेल्या पर्यायी गायरान जागेबाबत गावातील नागरिकांना माहिती दिली. परंतु, ज्या ठिकाणी जागा उपलब्ध आहे त्या परिसरातील राहत असलेल्या स्थानिक नागरिकांनी प्रकल्प करण्यास तीव्र विरोध दर्शविला आहे. तसेच वनविभागाची टाकवे गावालगत असलेल्या जागेच्या मागणीबाबत पत्रव्यवहार करुन जागा मिळण्यासाठी पुढील दिवसांमध्ये प्रयत्न करण्यात येणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.
टाकवे ग्रामस्थांकडून दत्तात्रय असवले, स्वामी जगताप, तानाजी असवले, नवनाथ आंबेकर, अनिल असवले यांनी तर फळणे ग्रामस्थांकडुन परशुराम मालपोटे, विलास मालपोटे यांनी व बेलज ग्रामस्थांकडून मधुकर कोकाटे, पप्पू वाजे, उमाकांत मदगे, मंगेश लांगी, संदीप गवारी यांनी कचरा प्रश्नांबाबत मनोगते व्यक्त केली. सदर बैठकीला ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब मतकर, सरपंच सुवर्णा असवले, उपसरपंच प्रतिक्षा जाधव, मा सरपंच भुषण असवले, मा उपसरपंच अविनाश असवले, परशुराम मालपोटे, सोमनाथ असवले, सदस्या आशा मदगे उपस्थित होत्या. ( Space constraints for solid waste management project through Gram Panchayat at Takwe Budruk )
“सदर कचरा व्यवस्थापन प्रकल्प करण्यासाठी बेलजच्या जागेचा विचार करण्यात आला होता. परंतु स्थानिक नागरिकांच्या विरोधामुळे प्रकल्प होऊ शकला नाही. आमदार सुनील शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाच्या जागेसाठी पाठपुरावा करत आहोत.” – सुवर्णा असवले, सरपंच, टाकवे ग्रुप ग्रामपंचायत
“सदर ग्रामपंचायत तीन गावे मिळुन आहे. बेलज आणि फळणे येथे गायरान जागा उपलब्ध आहे. परंतु त्या परिसरातील नागरिकांचा प्रकल्पास तीव्र विरोध असल्याने इतर पर्यायी जागेची चाचपणी करुन प्रकल्पासाठी लवकर जागा निश्चित केली जाईल” – बाळासाहेब मतकर, ग्रामविकास अधिकारी, टाकवे
अधिक वाचा –
– क्रांती दिनी, भिडले राजकारणी ; श्रद्धांजलीच्या पावसात, राजकारण जोरात
– श्रावण मास । नागपंचमी विशेष : श्रावणातील नाग-नरसोबाचा कागद म्हणजे प्राचीन मातृका पुजनाचे आधुनिक रुप
– माळवाडी येथे जिल्हा परिषद शाळेच्या नवीन वर्गखोल्यांचे भूमिपूजन, आमदार शेळकेंच्या माध्यमातून 30 लाखांचा निधी
– तळेगाव शहरातील महिलांसाठी सुवर्णसंधी ! ‘या’ दोन ठिकाणी मोफत शिवणकाम, आरी वर्क, फॅशन डिझायनिंग क्लासेस सुरू