प्रसिद्ध मराठी कवी ना. धों. महानोर अर्थात नामदेव धोंडो महानोर यांचे निधन झाल्याची दुःखद बातमी समोर येत आहे. वृद्धापकाळाने आणि उपचारार्थ असताना महानोर यांचे निधन झाले. पुण्यातील रूबी हॉल इथे आज (गुरुवार, दिनांक 3 ऑगस्ट) सकाळी 8.30 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे साहित्य आणि कला क्षेत्रात शोक व्यक्त केला जात आहे. ( Famous Marathi Poet ND Mahanor ie Namdev Dhondo Mahanor Passes Away In Pune )
महानोर यांचा पहिला काव्यसंग्रह अर्थात रानातल्या कविता (1967) त्यानंतर वही (1970) आणि पावसाळी कविता (1982) असे आणखी दोन काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले. गांधारी (कादंबरी−1972), गपसप (1972), गावातल्या गोष्टी (1981−दोन्ही लोककथासंग्रह) असे गद्यलेखनही त्यांनी केले. त्यांनी केलेले लोकगीतांचे एक संकलनही (पळसरोडची गाणी, 1982) प्रसिद्ध झालेले.
माझे जवळचे मित्र आणि महाराष्ट्राचा रानकवी ना. धो. महानोर यांच्या निधनाने मला अतिशय दुःख झाले आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील पळसखेड खेड्यात गरीब शेतकरी कुटूंबात जन्मलेल्या ना. धों. चे बालपण कष्टात गेले पण कष्ट झेलताना त्यांचे संवेदनशील मन रानात रमले. तिथेच त्यांच्या सर्जनशीलतेला धुमारे… pic.twitter.com/SF42UsISfp
— Sharad Pawar (@PawarSpeaks) August 3, 2023
रानातल्या कविता, पही, गांधारी ह्या त्यांच्या पुस्तकांत महाराष्ट शासनाने पारितोषिके-पुरस्कार देऊन गौरविले. मराठीतील महत्त्वपूर्ण काव्यलेखनासाठी देण्यात येणारे ग. दि. मा. पारितेषिकही त्यांना मिळाले (1981-82). महाराष्ट्रातील साहित्यिक−कलावंतांने प्रतिनिधी म्हणून 1978 मध्ये महाराष्ट्र विधान परिषदेवर महाराष्ट्र शासनाने त्यांची नियुक्ती केली होती.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– “पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प कायमस्वरूपी रद्द करा..अन्यथा..”, रविंद्र भेगडे यांचा आक्रमक इशारा
– अखेर महाराष्ट्राच्या विधानसभेला विरोधी पक्षनेता मिळालाच..! काँग्रेसच्या हायकमांडने ‘या’ नेत्यावर सोपवली जबाबदारी
– लोणावळा स्टेशनसह देशातील तब्बल 1 हजार 309 रेल्वे स्थानकांचा होणार कायापालट । Amrit Bharat Station Scheme