व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, April 16, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

अलर्ट! पवना नदीकाठच्या नागरिकांसाठी महत्वाची सुचना, लगेच वाचा…

पवना नदी काठच्या सर्व नागरिकांना पवना धरण पूरनियंत्रण कक्षाकडून अलर्ट करण्यात आले आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
August 3, 2023
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल, शहर
Pavana-Dam-Maval-Taluka

Photo Courtesy : Fie Photo / Pavana Dam


पवना नदी काठच्या नागरिकांसाठी अत्यंत महत्वाची सुचना देण्यात आलेली आहे. मावळ तालुक्यात पवनमावळ भागात असलेले पवना धरण आजमितीला (दिनांक 3 ऑगस्ट) 92 टक्के इतके भरलेले आहे. पवना धरणात पाण्याची आवक ही सातत्याने होत आहे. त्यामुळे पवना नदी काठच्या सर्व नागरिकांना पवना धरण पूरनियंत्रण कक्षाकडून अलर्ट करण्यात आले आहे. ( Pavana Dam Update Residents of Pavana Dam And River Banks Are Warned To Be Alert )

“आज दिनांक 03 ऑगस्ट 2023 रोजी पवना धरण 92.27 टक्के क्षमतेने भरले आहे. तरी वीज निर्मिती गृहाद्वारे पवना नदी मध्ये सकाळी 11 वाजता 1400 क्यूसेक्स विसर्ग करण्यात येणार आहे. तसेच धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण पाहता येत्या 24 ते 48 तासांमध्ये पवना धरणाच्या सांडव्यावरून पवना नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू करण्याची दाट शक्यता आहे. तरी पवना नदी काठच्या सर्व नागरिकांना सूचित करण्यात येते की, कृपया नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदी मधील पाण्याचे पंप, नदी काठचे शेती अवजारे व तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत. कृपया सखल भागातील संबंधित नागरिकांना सूचना देण्यात याव्यात व सर्वांनी योग्य ती दक्षता घ्यावी व पाटबंधारे विभागास सहकार्य करावे ही विनंती” अशी सुचना पवना धरण पूरनियंत्रण कक्षाकडून देण्यात आलेली आहे.

पवना धरण 92 टक्के भरले….

मागील गेल्या 24 तासात पवना धरण आणि परिसरात 31 मी.मी. इतका पाऊस झाला आहे. तसेच 1 जूनपासून झालेला एकूण पाऊस हा 1893 मी.मी. इतका आहे. ह्यासह सध्या पवना धरणातील सध्याचा पाणी साठा हा 92.27 टक्के इतका झाला आहे. वेधशाळेने पुन्हा एखदा पावसाचा इशारा दिला असल्याने पवना धरण परिसरात पावसाने मोठ्या प्रमाणात हजेरी लावल्यास पवना धरणातून पाण्याचा विसर्ग केला जाईल, अशी शक्यता यापूर्वीच व्यक्त करण्यात आली होती. त्यानुसार आता नागरिकांना दक्ष राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. ( Pavana Dam Update Residents of Pavana Dam And River Banks Are Warned To Be Alert )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– “पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प कायमस्वरूपी रद्द करा..अन्यथा..”, रविंद्र भेगडे यांचा आक्रमक इशारा
– अखेर महाराष्ट्राच्या विधानसभेला विरोधी पक्षनेता मिळालाच..! काँग्रेसच्या हायकमांडने ‘या’ नेत्यावर सोपवली जबाबदारी
– लोणावळा स्टेशनसह देशातील तब्बल 1 हजार 309 रेल्वे स्थानकांचा होणार कायापालट । Amrit Bharat Station Scheme


Previous Post

महत्वाची बातमी! पुणे रिंग रोडसाठी आतापर्यंत 125 एकराचा ताबा, जमीन मालकांना 250 कोटींचा मोबदला वाटप । Pune Ring Road

Next Post

महाराष्ट्राचा रानकवी हरपला..! ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांचे पुण्यात निधन

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Namdeo-Dhondo-Mahanor

महाराष्ट्राचा रानकवी हरपला..! ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांचे पुण्यात निधन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Minister Aditi Tatkare

लाडक्या बहिणींनो… ई-केवायसी च्या नावाखाली खोट्या आमिषांना बळी पडू नका – मंत्री आदिती तटकरे यांचे आवाहन

April 15, 2026
Milind Yuvak Mandal Sanghmitra Mahila Mandal pay tribute to Dr Babasaheb Ambedkar in Vadgaon Maval

मिलिंद युवक मंडळ, संघमित्रा महिला मंडळ यांच्याकडून वडगावमध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

April 15, 2026
Maval Taluka Agricultural Produce Market Committee dissolved due to lack of quorum

गणपूर्ती होत नसल्याने मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त ! प्रशासक म्हणून सहाय्यक निबंधक नवनाथ अनपट यांची नियुक्ती

April 15, 2026
Maval Diwad Gram Panchayat distributes 5 percent disability fund to beneficiary disabled citizens

दिवड ग्रामपंचायतीकडून लाभार्थी दिव्यांग नागरिकांना ५ टक्के दिव्यांग निधीचे वाटप

April 15, 2026
administration has started land acquisition process to develop MIDC areas in Baur Brahmanwadi Karunj areas Maval

बौर, ब्राम्हणवाडी, करूंज परिसरात एमआयडीसी क्षेत्र विकसित करण्यासाठी प्रशासनाकडून भूसंपादन प्रक्रियेला सुरूवात

April 14, 2026
Shubhra Gade from Maval won gold medal in state level powerlifting competition in Sangli

सांगली येथील राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत मावळच्या शुभ्रा गाडे हिने पटकाविले सुवर्णपदक ; आंध्रप्रदेशात होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

April 14, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.