Dainik Maval News : ‘तू इथे काम करायचे नाही’ असे म्हणत शेतकऱ्याला लोखंडी रॉडने मारहाण केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. दिनांक 22 सप्टेंबर रोजी मावळ येथील जांभवडे परिसरात ही घटना घडली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
याप्रकरणी नवनाथ बबन कोयते (वय 43 रा.तळेगाव दाभाडे) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून पोलिसांनी हरिभाऊ वैजनाथ केंद्रे, शशिकांत रामलिंग, सुरवसे प्रदीप पोपट भसे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे मामेभाऊ हे जांभवडे येथील गट क्रमांक 93 मध्ये वॉल काउंटचे काम करत होते. यावेळी फिर्यादी तिथे जाऊन काम करत असताना आरोपी तिथे आले व तू इथे काम करायचं नाही काम थांबव म्हणून त्यांनी लोखंडी रॉडने फिर्यादी यांना मारहाण केली. दमदाटी करत धमकी दिली. यावरून तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
अधिक वाचा –
– विजेच्या लपंडावामुळे त्रस्त टाकवे बुद्रुकचे ग्रामस्थ ; महावितरणच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा । Maval News
– राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण मोहीमेची कार्ला येथे सुरूवात ; प्राथमिक आरोग्य केंद्रात क्षयरोग लसीकरण । Karla News
– निगडे गावातील साकव पूल, सभामंडप, नवीन विद्युत पोल, रस्त्यांचे प्रश्न मार्गी ; ग्रामस्थांनी मानले आमदार सुनिल शेळकेंचे आभार