Dainik Maval News : रब्बी हंगाम २०२५-२६ मध्ये गहू, कडधान्य, पोषक तृणधान्य, ऊस, करडई, मोहरी व सूर्यफूल या पिकांच्या उत्पादनवाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकरी प्रात्यक्षिक कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. या पीक प्रात्यक्षिकांचा तालुक्यातील शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या व सहकारी संस्थांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मावळ तालुका कृषी अधिकारी मारुती साळे यांनी केले आहे.
पीक प्रात्यक्षिकांसाठी कोणत्याही शासकीय यंत्रणेकडे ३१ मार्च २०२४ पूर्वी नोंदणीकृत शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी व कृषी क्षेत्रात कार्यरत सहकारी संस्था यांना लाभ देण्यात येणार आहे. यासाठी गटाने प्राधिकृत केलेल्या सदस्याने महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याची सुविधा २ सप्टेंबर २०२५ पासून उपलब्ध आहे.
गटांची निवड प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर करण्यात येणार आहे. महाडिबीटी पोर्टलवर अर्ज सादर करताना https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/AgriLogin/AgriLogin या संकेतस्थळावर ‘बियाणे वितरण, प्रात्यक्षिक, फ्लेक्सी घटक, औषधे आणि खते’ या टाईल अंतर्गत शेतकरी गटांना अर्ज करता येतील.
शासनाच्या धोरणात्मक निर्णयानुसार अर्ज करणाऱ्या व लाभ घेणाऱ्या गट सदस्यांचा फार्मर आयडी असणे आवश्यक आहे. तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकरी गटांनी विविध पिकांच्या पीक प्रात्यक्षिके या घटकासाठी अर्ज करावेत व लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी मारुती साळे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही त्यांनी सांगितले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात ग्लास स्काय वॉक प्रकल्पाबाबत विशेष बैठक संपन्न । Lonavala Glass Sky Walk
– अल्पवयीन मुली, महिलांचे अपहरण करून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद ; पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कामगिरी
– उर्से खिंडीत गणेशमूर्ती आढळल्याने खळबळ; संकलित केलेल्या मूर्तींचे योग्य प्रकारे विसर्जन न केल्याने नागरिकांचा संताप । Maval News
– अजित पवार यांच्या सूचनेनंतर चाकणमधील अतिक्रमणविरोधी कारवाईला वेग ; पीएमआरडीएकडून कारवाई सुरू । Chakan News

