मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर आज (शुक्रवार, दिनांक 19 मे) पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील सहांपैकी एक मुलगी जागीच मृत पावली असून अन्य पाचजण गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारार्थ जवळील रुग्णालायात दाखल कऱण्यात आले. ( Fatal accident near Urse toll booth on Mumbai Pune Expressway one girl died on spot )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
प्राप्त माहितीनुसार, मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर आज पहाटे 3.00 च्या सुमारास उर्से टोल नाक्याजवळ पुणे लेन वर कारची (क्रमांक MH 12 NJ 2419) शोल्डर लेन वरील आयशर टेम्पोला (क्रमांक MH 12 TV 5039) धडक बसली. ही धडक एवढी जोरदार होती की, त्यातील सहा जणांपैकी एक मुलगी जागीच मरण पावली. इतर जखमीना आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, महामार्ग वाहतूक पोलीस व ऍम्ब्युलन्सच्या मदतीने उपचारार्थ हॉस्पिटल मध्ये पाठवण्यात आले.
अधिक वाचा –
– कातवी गावातील ‘पहिली महिला पोलिस’ बनली ‘क्षितिजा चव्हाण’, मावळकन्येवर होतोय शुभेच्छांचा वर्षाव
– अखेर कुणे गावाजवळील ‘त्या’ पुलाचा तुटलेला सुरक्षा कठडा प्रशासनाने बांधला, नागरिकांकडून समाधान व्यक्त