Fatal Accident On Old Mumbai Pune Highway : जुन्या मुंबई पुणे महामार्गावर आज (दि. 3 एप्रिल) देहूरोड जवळ एक भीषण अपघात घडला. दोन वेगवान आरएमसी वाहन चालकांच्या मध्ये सापडलेल्या कारची अक्षरशः दामटी झाली. या भीषण अपघातात कान्हे गावाचे तलाठी रवी मोहरूत हे सुदैवाने बचावले आहेत. कारमधील एअरबॅग उघडल्याने त्यांचा जीव वाचला. परंतू आज पुन्हा एकदा अवजड वाहनचालकांच्या बेपरवाईमुळे एका भीषण अपघाताचा प्रत्यय सर्वांना आला. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
नेमके काय झाले?
देहूरोडच्या पुढे आणि घोराडेश्वरच्या अलिकडे मुंबई लेनवर हा अपघात घडला. डिव्हाईडर साईडने जात असलेल्या RMC वाहनाच्या मागे तलाठी मोहरूत यांची कार होती. कारचे स्पीड RMC वाहनासोबत अंतर राखून होते. परंतू समोरील RMC वाहनाने अचानक ब्रेक मारला. मोहरूत यांनीही आपली कार कंट्रोल केली. परंतू त्यांच्या कारच्या मागून देखील एक आरएमसी वाहन येत होते. जे प्रचंड वेगात होते. त्या वाहनाने तलाठी मोहरूत यांच्या कारला पाठीमागून धडक दिली. त्यामुळे त्यांची कार पुढील वाहनाला धडकली आणि पाठीमागून आलेले वाहन, यात त्यांच्या कारचे मोठे नुकसान झाले. परंतू सुदैवाने कारमधील एअरबॅग वेळेवर उघडल्याने जिवितहानी झाली नाही.
ह्या अपघाताने काहीवेळ देहूरोड फाट्याजवळ मोठी वाहतूक कोंडी झाली होती. परंतू देहूरोड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत, दोन्ही वाहने बाजूला काढली आणि वाहतूक सुरळीत केली. ( Fatal Accident On Old Mumbai Pune Highway Due To Carelessness Of RMC Vehicle Drivers )
अधिक वाचा –
– नागरिकांनो..पाणी जपून वापरा! पवना धरणातील पाणी आटू लागलंय, फक्त ‘इतक्या’ दिवसांचा जलसाठा शिल्लक । Pavana Dam
– ओवळे गावात मोफत आरोग्य तपासणी आणि मार्गदर्शन शिबिर संपन्न । Maval News
– पुणे, बारामती, शिरूर आणि मावळ लोकसभेसाठी धनगर समाजाची बैठक संपन्न । Lok Sabha Election 2024