पुणे मुंबई यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर एक अत्यंत भीषण अपघात झाला आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर उर्से टोलनाक्याजवळ हा अपघात झाला. एका भरधाव कारची ट्रकला धडक बसली, या अपघातात कारच्या समोरील भागाचा अक्षरशः चुराडा झाला असून यात 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
आज गुरुवार, दिनांक 6 एप्रिल रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास किलोमीटर 82 वर हा अपघात घडला, अशी माहिती समोर येत आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
प्राप्त माहितीनुसार, ब्रिझा कार (क्रमांक एम.एच. 12 यू.एन. 4137) ही मुंबईहून पुण्याच्या दिशेने जात असताना उर्से टोलनाक्यापुढे उभ्या असलेल्या ट्रकला या कारची जोरात धडक बसली. यात कारमधील चार जणांचा गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यू झाला आहे.
महामार्ग पोलिस, आयआरबी कर्मचारी, देवदूत यंत्रणा यांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत बचावकार्य सुरु केले. तसेच चारही मृतदेह तळेगाव दाभाडे येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. मृतांची नावे अद्याप समोर आलेली नाहीत. ( Fatal car accident near Urse toll plaza on Mumbai Pune Expressway 4 killed )
अधिक वाचा –
– अपघात ब्रेकिंग! जुना मुंबई पुणे हायवेवर नायगाव हद्दीतील पेट्रोल पंपासमोर अपघात, अनोळखी महिला ठार
– ब्रेकिंग! मावळ तालुक्यात धरणात बुडून पर्यटक तरुणाचा मृत्यू