Dainik Maval News : लोणावळा शहरात भरदिवसा एका महिलेच्या गळ्यातील दागिने हिसकावून चोरी केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून यामुळे लोणावळा शहरातील महिलांची सुरक्षा आणि चैन स्नॅचिंग करणाऱ्या चोरट्यांचा सुळसुळाट हे प्रश्न ऐरणीवर आले आहेत. तसेच भरदिवसा होणाऱ्या या घटनांमुळे महिला वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.
लोणावळ्यात अलिकडे महिलांच्या गळ्यातील दागिने चोरण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. मागील आठवड्याभरात महिलांचे दागिने हिसकावून नेण्याच्या तीन घटना घडल्या आहेत. यामुळे महिला वर्गात प्रचंड भीतीचे वातावरण आहे. लोणावळ्यातील रायवूड पार्क, भांगरवाडी आणि काल परवा वळवण भागात दुचाकीस्वार चोरट्यांनी रस्त्याने पायी चालत असलेल्या महिलांच्या गळ्यातील दागिने चोरले. बापदेव रोड, वलवण येथे महिलेच्या गळ्यातील दागिने चोरतानाचा व्हीडीओ सीसीटीव्हीत कैद झाला असून चोरटे सहजरित्या दागिने लंपास करत असल्याचे दिसत आहे.
लोणावळा शहरात सोनसाखळी चोरीचे प्रमाण वाढले असून शहर पोलीस याबाबत गांभीर्याने घेत नाही, असे दिसून येत आहे. महिलांना एकटे गाठून चोरटे महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र ओढून नेण्याच्या चार-पाच घटना घडल्या असताना देखील पोलीस कुठलीच कारवाई करीत नाहीत. पोलिसांच्या दुर्लक्षामुळे महिलांच्या जीवाला अपाय होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सोनसाखळी चोरांविरुद्ध कठोर पावले उचलावीत. अन्यथा महामार्गावर रस्ता रोको करु, असा इशारा आरपीआयचे सूर्यकांत वाघमारे यांनी दिला आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यातील ‘या’ महत्वाच्या चौकांमध्ये उड्डाणपूल उभारणे गरजेचे ; आमदार सुनिल शेळके यांची अधिवेशनात मागणी
– मोठी बातमी : पुणे-लोणावळा लोहमार्गावरील तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकला मिळणार गती । Pune – Lonavala Local
– मावळातील शेतकऱ्यांची भात भरडण्यासाठी लगबग ; इंद्रायणी तांदुळाला सर्वोत्तम दराची अपेक्षा । Maval News