वडगाव बुद्रुक ( Vadgaon Budruk ) परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहात पारंपारिक पद्धतीने मिरवणूक काढत भाद्रपदी बैल पोळा ( Bail Pola ) सण साजरा केला. यंदा बैल पोळ्यावर प्राण्यामध्ये पसरत असलेल्या लम्पी रोगाचे ( Lumpy Skin ) संकट आले. त्यामुळे शेतकऱ्यांनी सरकारच्या आदेशाचे पालन करत मिरवणूकीत सजीव बैलांचा वापर न करता फायबरच्या बैलांचा ( Fiber Bull ) वापर करत आपली परंपरा जोपासली आणि प्राण्यांवर आलेले संकट दूर करण्यासाठी बळीराजाला ( Farmer ) साकडे घालण्यात आले. फायबरच्या बैलांचे पारंपरिक पद्धतीने पूजन करून त्यांना पुरणपोळीचा नैवद्य दाखवून मिरवणूक सुरू झाली.
प्रगतिशील शेतकरी कांतिराम (अण्णा) जाधव यांच्या पुढाकारातून ही पारंपारिक मिरवणूक काढण्यात आली. यावेळी -श्रीमंत दगडूशेट हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष माणिकदादा चव्हाण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ( Fiber Bull Bail Pola Procession )
हेही वाचा – गेवरेवाडी येथे महिलांसाठी विनामुल्य व्यावसायिक प्रशिक्षण शिबिर
युवराज कांतिराम जाधव, चैतन्य कांतिराम जाधव यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. बैल पोळ्यानिमित्त काढण्यात आलेल्या या पारंपारिक मिरवणुकीमध्ये वडगाव बुद्रुकवासीयांना पारंपारिक लाकडी खेळ, ढोल लेझिम, लाईव्ह ऑर्केस्ट्रा यासह दांडपट्टा चे चित्तथरारक प्रात्याक्षिके पाहायला मिळाली.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
मागील 40 वर्षांपासून जाधव नगर, वडगाव बुद्रुक येथे पारंपारिक बैल पोळा सण साजरा होतो. यंदा प्राण्यांवर लम्पी रोगाचे संकट असले तरी परंपरेत खंड पडू न देता, फायबरच्या बैल मूर्तींची मिरवणूक काढत हा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला. ( Fiber Bull Bail Pola Procession Pune Vadgaon Budruk Video )
अधिक वाचा –
मावळमध्ये शेतकऱ्याचा कौतुकास्पद उपक्रम! बैल पोळ्याच्या मिरवणूकीचा खर्च टाळून केली मोठी मदत
लम्पी स्कीन : बाळा भेगडे यांच्या प्रयत्नातून मावळ तालुक्यासाठी तातडीने 10 हजार लशी उपलब्ध