वडगाव मावळ येथील संस्कृती फाऊंडेशन आणि वडगाव शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने आदर्श विद्यालयात बारावी परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावलेल्या ओम खंडूजी काकडे याला पुढील शिक्षणासाठी आर्थिक मदत देऊन त्याचा खास सन्मान करण्यात आला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
संस्थेच्या संस्थापक व राष्ट्रवादी महिला आघाडीच्या शहराध्यक्षा पद्मावती ढोरे, कार्याध्यक्षा वैशाली ढोरे, पदाधिकारी रेश्मा ढोरे, सारिका विनोदे, रुपाली तुमकर, सुजाता घारे, रुपाली चव्हाण, करुणा पवार, उर्मिला काकडे, युवती अध्यक्ष भाग्यश्री विनोदे आदीजण यावेळी उपस्थित होते. ( Financial assistance to student from Sanskriti Foundation and Vadgaon NCP Mahila Congress )
ओम काकडे हा सर्वसामान्य कुटुंबातील असून त्याचे वडील खाजगी नोकरीत, तर आई अंगणवाडी मदतनीस म्हणून कार्यरत आहे. ओमने कुठलाही क्लास न लावता तळेगाव दाभाडे येथील आदर्श विद्यालयात 85.17 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 25व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून गुणवंत विद्यार्थ्यावर कौतुकाची थाप आणि सामाजिक बांधिलकी जपण्याच्या हेतूने ही मदत करण्यात आल्याचे अध्यक्षा पद्मावती ढोरे यांनी सांगितले.
अधिक वाचा –
– अजिवली शाळेतील शिक्षिका वर्षा बारबोले यांना जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार
– मावळ तालुक्यातील पवना धरणग्रस्तांसाठी सरकारचे प्रमुख 5 निर्णय, एका क्लिकवर वाचा सर्व निर्णय । Pavana Dam Affected Farmers News
– ब्रेकिंग ! पवना धरणग्रस्तांना 50 वर्षांनंतर मिळाला न्याय, आमदार सुनिल शेळके आणि धरणग्रस्तांच्या सातत्यपुर्ण प्रयत्नांना यश