मुलीला नोकरीला लावतो आणि मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातून 1 कोटीचे कर्ज मंजूर करून देतो, असे अमिष दाखवून एका महिलेची 4 लाख 3 हजार 240 रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना तळेगाव दाभाडे इथे घडली आहे. दिनांक 8 मे 2023 ते 24 ऑक्टोबर 2023 या कालावधीत हा संपूर्ण प्रकार घडला. या प्रकरणी महिलेने तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात मंगळवारी (दि. 24 ऑक्टो) फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी संशयित राजेश चव्हाण (रा. चिंचवड) याच्यासह एका महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयितांनी फिर्यादी महिला आणि तिच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातून एक कोटीचे कर्ज देण्याचे अमिष दाखवले. तसेच फिर्यादी यांच्या मुलीला नोकरी लावून देतो, असे सांगून फिर्यादी यांच्याकडून 4 लाख 3 हजार 240 रुपये उकळले. मात्र, जेव्हा नोकरीबाबत विचारणा केली तेव्हा उडवा उडवीची उत्तरे दिली. तसेच फोन बंद करुन ठेवले. अधिक माहिती घेतली असता आरोपी मंत्रालयात कामाला नसून त्यांनी कर्ज मंजूर करून न देतो आणि मुलीला नोकरीला लावतो असे खोटे सांगून फसवणूक केल्याची समजल्याने महिला फिर्यादीने फिर्याद दाखल केली. ( Financial fraud of woman in Talegaon Dabhade Maval Crime News )
अधिक वाचा –
– निसर्गाच्या सानिध्यात असलेलं आंदर मावळातील पारिठेवाडी गावातील शिवकालीन महादेवी देवस्थान; पर्यटकांनाही पडतेय भुरळ
– मावळ तालुक्यातील ‘या’ गावात राजकीय पक्षांच्या नेत्यांना ‘नो एन्ट्री’, सकल मराठा समाजाकडून तहसीलदारांना निवेदन
– रोटरी क्लबच्या माध्यमातून तळेगावात नागरिकांसाठी ‘ओपन जीम’ची उभारणी; आमदार शेळकेंच्या हस्ते लोकार्पण