पुणे : येत्या ऑगस्ट 2023 महिन्यात पक्की अनुज्ञप्ती (पक्के ड्रायव्हिंग लायसन्स) मिळण्याच्या दृष्टीने पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे खेड, मंचर, जुन्नर, वडगाव मावळ आणि लोणावळा येथे मासिक दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. पिंपरी चिंचवड उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी याबाबत माहिती दिली आहे.
पक्क्या अनुज्ञप्तीच्या चाचणीसाठी 2 आणि 3 ऑगस्ट रोजी खेड इथे, 7 आणि 8 ऑगस्ट रोजी मंचर इथे, 17 आणि 18 ऑगस्ट रोजी जुन्नर इथे, 22 आणि 23 ऑगस्ट रोजी वडगाव मावळ इथे आणि 28 ऑगस्ट रोजी लोणावळा येथे मासिक दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. पक्क्या अनुज्ञप्तीसाठी 31 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजता कोटा उपलब्ध होणार आहे, असेही आरटीओकडून कळविण्यात आले आहे. ( firm license by pimpri chinchwad sub rto office gather in maval taluka August 2023 )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– ‘तळेगाव नगरपरिषदेच्या कचरा कॉन्ट्रॅक्ट बाबत चौकशीचे आदेश द्या, अन्यथा आंदोलन करू…’, वाचा काय आहे प्रकरण
– माळेगाव खुर्द येथील सेवाधाम ट्रस्ट आश्रम शाळेतील मुलांना ‘होप फॉर द चिल्ड्रेन फाउंडेशन’कडून मोठी मदत
– ‘हॅलो! तुमचे विम्याचे पैसे आलेत पण….’ वयोवृद्धाची मोठी आर्थिक फसवणूक, तळेगाव एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल