रेल्वे स्टेशन पुणे व होप फॉर द चिल्ड्रन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने रेल्वे स्टेशन बाल स्नेही कक्षाचा प्रथम वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला पुणे रेल्वे स्टेशन मॅनेजर माननीय मदनलाल मीना हे प्रमुख पाहून म्हणून उपस्थित होते.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करुन करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक होपचे व्यवस्थापक शकील शेख यांनी केले. या प्रकल्पांतर्गत बालके, महिला व ज्येष्ठ नागरिकांना मदत केली जाते. आजपर्यंत झालेल्या केसेसचा यावेळी आढावा देण्यात आला. त्यानंतर उपस्थित मान्यवरांना सन्मानित करण्यात आले. त्यानंतर सामाजिक कार्यामध्ये विशेष कार्य करणारे राजेंद्र आहेर व ऋषिकेश डिंबळे यांना विशेष सामाजिक कार्य पुरस्कार देण्यात आला.
प्रकल्पासाठी सहकार्य करणारे टिळक महाराष्ट्र विद्यापीठ समाजकार्य विभाग, कर्वे समाज विकास संस्था, भारती विद्यापीठ समाजकार्य विभाग, सेंट मीरा कॉलेज येथील विद्यार्थींना यावेळी प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. कार्यक्रमासाठी उपस्थितमध्ये मदनलाल मीना (स्टेशन डायरेक्टर) सुनील ढोबळे (S M मॅनेजर) अनिल तिवारी (स्टेशन मॅनेजर) राजेंद्र गायकवाड – पोलीस निरीक्षक लोहमार्ग पोलीस, होप फॉर द चिल्ड्रेन फाउंडेशन CSR व्यवस्थापक अंकिता जैन, आत्मनिर्भयता व्यवस्थापक सरिता शेलार व होप फॉर द चिल्ड्रेन फाउंडेशन चे समन्वयक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋषिकेश डिंबळे यांनी केले. ( first anniversary of Pune Railway Station Child Friendly Room )
अधिक वाचा –
– वडार समाजाच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांची 8 मे रोजी पिंपरीमध्ये जाहीर सभा
– बाळा भेगडेंसह मावळ तालुक्यातील ‘या’ दोन भाजपा पदाधिकाऱ्यांचीही प्रदेश कार्यकारिणीत निवड