पुणे : वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड प्रकाश आंबेडकर यांची पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यामागे भीमसृष्टी येथे सोमवार (दिनांक 8 मे) रोजी सायंकाळी 6 वाजता भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला संपूर्ण महाराष्ट्रातून वडार समाज मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे. वर्षानुवर्ष वडार समाजाच्या विविध मागण्या दुर्लक्षित आहेत. या समाजाला न्याय मिळवुन देण्यासाठी व त्यांच्या मागण्यांकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
वडार समाजाला मोफत शिक्षण मिळाले पाहिजे, शासकीय नोकऱ्यांमध्ये स्वतंत्र आरक्षण, जाचक अटीविना जातीचे दाखले मिळावे, क्रिमिलिअरची अट रद्द करावी, वडार समाज जेथे राहतो त्या जागा त्यांच्या नावावर करण्यात याव्या, वडार समाजाला गुन्हेगारी जात म्हणुन सरकारी नोंदीत असलेला ठपका काढून टाकावा, वडार समाजातील युवकांना उद्योगधंद्यासाठी बिनव्याजी कर्ज देण्यात यावे या व अशा अनेक प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी या सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील वडार समाजातील समाजबांधवांनी व बहुजन समाजाने या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सभेचे मुख्य संयोजक व वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल जाधव यांनी केले आहे. यावेळी पत्रकार परिषदेस अनिल कुऱ्हाडे, परेश शिरसंगे, प्रफुल्ल गुजर,अरविंद तायडे यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. ( Public Rally of Prakash Ambedkar in Pimpri Chinchwad on May 8 to draw attention to various demands of Wadar community )
अधिक वाचा –
– मावळमधील कोथूर्णे इथे 6 मे रोजी राज्यस्तरीय मराठा आरक्षण मंथन परिषद, वाचा सविस्तर
– श्री विठ्ठल परिवार मावळ व सकळ दिंडी नियोजन समिती यांकडून कान्हे इथे बाल वारकरी प्रशिक्षण शिबिर, जाणून घ्या