Dainik Maval News : पवनानगर जवळील येळसे गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये मावळ तालुक्यातील पहिल्या स्किल स्कूल शाळा प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. चैतन्य साॅफ्टवेअर टेक्नॉलॉजी पुणे आणि रोटरी क्लब ऑफ पुणे सेंट्रल यांच्या सहकार्याने व ग्रामविकास समिती येळसे यांच्या माध्यमातून या प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
कार्यक्रमापूर्वी सर्व विद्यार्थ्यांनी प्रमुख पाहुण्यांचे ढोल लेझीमच्या गजरात स्वागत केले. प्रकल्पाचे उद्घाटन अखिल भारतीय ग्राम विकास समितीचे सहसंयोजक शंभूजी गिरी यांच्या हस्ते करण्यात आले. चैतन्य देशपांडे यांनी स्कील स्कूलच्या माध्यमातून दिली जाणारी विविध 15 प्रकारची कौशल्ये प्रात्यक्षिक करून दाखविले. शाळेत ही सर्व कौशल्ये शिकवली जाणार आहेत. तसेच अलेक्सा डाॅलच्या माध्यमातून मुलांना इंग्रजी आणि हिंदी विषयांची भीती कमी होण्यास मदत होणार असून सामान्य ज्ञानाचीही माहिती मिळणार आहे. ( first skill school project in Maval taluka has started in Yelse ZP school )
वाबळेवाडी व जालिंदर नगर शाळेचा सर्वांगीण विकास करणारे दत्तात्रय वारे यांनी काले केंद्रातील सर्व शिक्षकांना शाळेतील विविध प्रश्नांबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका शर्मिला राजमाने यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गोरख जांभूळकर यांनी केले. तर, आभार वर्षा गायकवाड यांनी मानले. याप्रसंगी कानडे साहेब, सुनिल वारांबळे, रोटरी क्लबचे अधिकारी संघवी साहेब, विस्तार अधिकारी निर्मला काळे, केंद्रप्रमुख पांडूरंग ढेंगळे, शिक्षक संघाचे राजेश राऊत, ग्राम विकास समितीचे सर्व पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.
अधिक वाचा –
– आदर्श केंद्र शाळा कान्हे येथे स्वातंत्र्यदिन सोहळा उत्साहात साजरा । Maval News
– अजितदादांनी शब्द पाळला ! मावळातील 42 हजार भगिनींच्या खात्यावर लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा
– मावळातील 42 हजार महिलांना मिळाले लाडकी बहीण योजनेचे पैसे ; ज्यांना नाही मिळाले त्यांनी ‘हे’ काम नक्की करा