1 मे 1960 रोजी भारतात स्वतंत्र महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. तेव्हापासून 1 मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणजेच महाराष्ट्र राज्याचा निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. तसेच, 1 मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणूनही साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून वडगाव मावळ येथील मल्हार रेसिडेन्सीमध्ये ध्वजवंदन आणि छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ( Flag Hoisting Programs organized at Malhar Residency Vadgaon Maval )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अनेक सण समारंभ वेगवेगळ्या संकल्पना घेऊन आणि एकोप्याने साजऱ्या करणाऱ्या मल्हार रेसिडेन्सी अर्थात मल्हार कुटुंबीयांकडून 1 मे रोजी महाराष्ट्र दिन आणिु कामगार दिन याचे औचित्य साधून ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी प्रौढांसह बाल गोपाळांनी आपल्या भाषणांतून महाराष्ट्र राज्याचा इतिहास आणि कामगार दिनाचे महत्व सर्वांना समजावून सांगितले. ( 1st May Maharashtra Day 2023 and Labor Day 2023 )
मल्हार सोसायटीचे अध्यक्ष दीपक भालेराव यांनी सर्वांचे स्वागत करुन महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर अनेक पाहूणे मंडळी यांसह मल्हार कुटुंबातील सदस्य यांनी मनोगत व्यक्त केले. हभप गणेश महाराज जांभळे यांनीही सर्वांना मार्गदर्शन केले. त्यानंतर गिरीष गुजराणी यांनी आभार प्रदर्शन करुन कार्यक्रमाची सांगता केली. यावेळी समाजकार्यात अग्रेसर असणारे आणि मल्हार कुटुंबातील सदस्य नाना लगड यांनी सर्वांसाठी नाष्ट्याची सोय केली होती.
दैनिक मावळ – विशाल कुंभार (संपादक)
अधिक वाचा –
– ‘वारसा स्वच्छतेचा, मावळा शिवरायांचा’ । पुणे ग्रामीण पोलीस दलाकडून 3 मे रोजी किल्ले लोहगड इथे स्वच्छता अभियान
– कान्हे येथील जिल्हा परिषद शाळेतील ‘फ्युचरिस्टिक कॉम्प्युटर क्लासरूम’चे अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन
– वेहेरगावात मध्यरात्री दुकानांना आग, भीषण आगीत दुकाने जळून खाक – पाहा व्हिडिओ