व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, March 20, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

इंडिगो एअरलाईन्सच्या सेवा खंडीत होण्याचा मावळातील फूल उत्पादकांना फटका ; कोट्यवधीचे नुकसान

मावळ तालुक्यातील फूल उत्पादक शेतकऱ्यांनाही इंडिगो एअरलाईन्सच्या सेवा खंडीत होण्याचा मोठा फटका बसला आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
December 10, 2025
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, महाराष्ट्र
Maval taluka First in rose export in Maharashtra Valentine Day Special

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : विमान प्रवासातील आघाडीची कंपनी असलेल्या इंडिगो एअरलाईन्सच्या सेवेत व्यत्य आला असून शेकडो विमानउड्डाणे दररोज रद्द होत आहेत. इंडिगोच्या नेटवर्कमध्ये निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणी व वेळापत्रकातील बिघाडामुळे अनेक उड्डाणे रद्द होत असून याचा फटका जसा विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसत आहे, तसाच तो शेतमाल निर्यात करणाऱ्या शेतकऱ्यांनाही बसला आहे.

मावळ तालुक्यातील फूल उत्पादक शेतकऱ्यांनाही इंडिगो एअरलाईन्सच्या सेवा खंडीत होण्याचा मोठा फटका बसला आहे. मावळ तालुक्यातील मोठ्या प्रमाणात फूल उत्पादक शेतकरी असून या फूल उत्पादक शेतकऱ्यांपैकी काही शेतकरी आपल्या फुलांची परदेशात निर्यात करतात. अशा सर्व फूल उत्पादकांचा शेतमाल अर्थात फुले मोठ्या प्रमाणात विमानतळावर पडून आहेत. फूल हे नाशिवंत असल्याने ठराविक वेळेत त्यांची विक्री न झाल्यास नुकसान सोसावे लागते, आणि सद्य परिस्थितात हे नुकसान मावळातील फूल उत्पादक शेतकऱ्यांना सोसावे लागत आहे.

मावळ तालुक्यातील गुलाबांना परदेशात मोठ्या प्रमाणावर मागणी आहे, त्यामुळे निर्यात होत असते. सध्या लग्नसराईचा हंगाम असल्याने फुलांना मागणी चांगली आहे. परंतु वाहतूक व्यवस्था कोलमडल्याने दररोज देशभरातील बाजारपेठांमध्ये विमानाने जाणारी लाखो फुले, तसेच परदेशात जाणारी फुले विमानतळावरच पडून आहेत. दररोज मावळातून सुमारे 40 लाख गुलाबफुलांची वाहतूक होते. त्यापैकी सुमारे १० लाख गुलाब फुले एकट्या विमानाने विविध शहरांमध्ये जातात. किरकोळ बाजारात एका गुलाबाला २० रुपयांपर्यंत भाव मिळत असताना, वाहतूक थांबल्याने गेल्या पाच दिवसांत सुमारे ५० लाख रुपयांचे फुलांचे नुकसान झाले आहे.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– मध्य रेल्वेकडून लोणावळा स्थानकाजवळ तीन दिवस ब्लॉक ; पुणे-मुंबई रेल्वे सेवा होणार विस्कळीत, रेल्वे प्रवाशांना आवाहन…
– विकासाच्या मुद्द्यावर सुरू झालेल्या निवडणुका पैशांच्या मुद्द्यावर संपल्या ; मावळात नगरपंचायत, नगरपरिषद निवडणुकीत पैशांचा पाऊस
– राज्यातील सर्व नगरपंचायत, नगरपरिषदांची मतमोजणी २१ डिसेंबरला होणार ; नागपूर खंडपीठाचा आदेश, वाचा सविस्तर
– तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट ! सहा जागांवरील निवडणूक स्थगित, ‘हे’ आहे कारण


Previous Post

नगराध्यक्षाचं जनता ठरवेल, पण उपनगराध्यक्षाचं बोला ! उमेदवारांकडून उपनगराध्यक्षपदासाठी फिल्डिंग लावायला सुरूवात

Next Post

वडगावकरांची सकाळ वाहतूक कोंडीने ; वडगाव कमानीजवळ अवजड वाहन बंद पडल्याने महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
traffic-jams-old-Mumbai-Pune-highway

वडगावकरांची सकाळ वाहतूक कोंडीने ; वडगाव कमानीजवळ अवजड वाहन बंद पडल्याने महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Shiva devotees send message of fort conservation by erecting Gudhi at Tikona Fort Maval

Tikona Fort Maval : किल्ले तिकोणा गडावर गुढी उभारून शिवभक्तांकडून गडसंवर्धनाचा संदेश

March 20, 2026
Illegal-Liquor

परवानगीशिवाय हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये मद्य आढळल्यास परवाने रद्द करण्यात येणार – गृह राज्यमंत्री

March 20, 2026
E-Peek-Pahani

पीक पाहणीची मुदत ३१ मार्च २०२६ पर्यंत वाढवली ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे विधीमंडळात निवेदन

March 18, 2026
Talegaon Chakan Shikrapur Highway

तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाचे काम डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण होणार – सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री इंद्रनील नाईक

March 18, 2026
Ekvira-Devi

Karla Ekvira Devi : आई माऊलीचा उदो उदो !! कार्ला येथील आई एकवीरा देवीच्या मंदिर परिसरामध्ये चैत्री यात्रेची जोरदार तयारी

March 18, 2026
Change alignment of Pune-Hyderabad High Speed ​​Rail Corridor crossing Bhandara Dongar MP Shrirang Barne in Lok Sabha

श्रीक्षेत्र भंडारा डोंगराला छेदून जाणाऱ्या पुणे-हैदराबाद हायस्पीड रेल्वे कॉरिडोरची अलाईनमेंट बदला ; खासदार बारणे यांची लोकसभेत मागणी

March 18, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.