महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांचे निधन (Manohar Joshi Passes Away) झाले आहे. बुधवारी (दि. 21) मनोहर जोशी यांना हृदयविकाराचा झटका आल्याने हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती गंभीर होती, अखेर उपचारादरम्यान मनोहर जोशी सरांची प्राणज्योत मालवली. मनोहर जोशी यांच्या निधनाने एक कडवट शिवसैनिक, तसेच सुसंस्कृत राजकारणी हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे. मनोहर जोशी यांना सर्वच स्तरातून श्रद्धांजली वाहिली जात आहे. आज (दि. 23 फेब्रुवारी) दुपारी 2 वाजता त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यस्कार केले जाणार आहे. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी उर्फ सर यांचे आज, शुक्रवारी पहाटे 3 वाजून 02 मिनिटांनी हिंदुजा रुग्णालयात निधन झाले. मनोहर जोशी यांनी वयाच्या 86व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी माटुंगा पश्चिम, रुपारेल कॉलेज जवळील W54 या त्यांच्या सध्याच्या निवासस्थानी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळात ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी 2 वाजता अंत्ययात्रा सुरू होऊन नंतर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होतील. (Former Maharashtra CM Manohar Joshi Passes Away At Hinduja Hospital Mumbai)
थक्क करणारी होती राजकीय कारकीर्द –
मनोहर जोशी यांनी मुंबई महापालिकेचे नगरसेवक, महापौर, विधान परिषद सदस्य, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, खासदार, केंद्रीय अवजड उद्योग मंत्री, लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सदस्यपद भुषवलं होतं. इतक्या मोठमोठ्या राजकीय पदांवर जाऊनही ते नेहमी शांत, संयमी राहत. त्यांच्या वागण्या बोलण्यात शिक्षकी संयमीपणा होता. राजकारणातील हेडमास्तर म्हणून त्यांची ओळख होती.
कडवट शिवसैनिक हरपला –
मनोहर जोशी हे बाळासाहेब ठाकरे यांच्या अत्यंत निकटवर्तीयांपैकी एक होते. शिवसेनेच्या स्थापनेआधी केवळ ‘कोहिनूर क्लास’चे चालक असलेल्या मनोहर जोशींना बाळासाहेबांनी एका अडचणीच्या क्षणी मदतीचा हात दिला आणि मनोहर जोशी तेव्हापासून बाळासाहेबांचे भक्त झाले. ते त्यांची सावली बनले. पुढे शिवसेनेच्या वाटचालीतील प्रत्येक पायरीवर, बाळासाहेबां शेजारी मनोहर जोशी यांना पाहण्याची शिवसैनिकांना जणू सवयच होऊन गेली होती. त्यामुळेच शिवसेना भाजपाच्या युतीचे सरकार जेव्हा 1995 मध्ये आले, तेव्हा बाळासाहेबांनी मनोहर जोशी यांनी राज्याचे मुख्यमंत्री केले होते.
श्रद्धांजलीचा महापूर –
शून्यातून विश्व निर्माण करणारे..
कडवट महाराष्ट्र अभिमानी
अखेरच्या श्वासा पर्यन्त शिवसैनिक म्हणुन जगलेले
मनोहर जोशी यांना विनम्र अभिवादन! pic.twitter.com/QV48ikmWv1— Sanjay Raut (@rautsanjay61) February 23, 2024
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि लोकसभेचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ नेते मनोहर जोशी सरांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतिशय दुःख झाले. सरांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणाचा सुसंस्कृत चेहरा हरवला. अतिशय नम्र, हजरजबाबी आणि महाराष्ट्र तसेच मराठी माणूस यांच्याविषयी मनापासून तळमळ असलेला…
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) February 23, 2024
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, शिवसेनेचे (उध्दव बाळासाहेब ठाकरे) ज्येष्ठ नेते मनोहर जोशीजी यांच्या निधनाची वार्ता अतिशय दुःखद आहे.
त्यांच्या निधनाने सर्वसामान्य कुटुंबातून येत महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषवणारे आदर्श व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले.
त्यांच्या आत्म्यास शांती… pic.twitter.com/fWwrv1jCHR— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) February 23, 2024
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, सार्वजनिक जीवनात नगरसेवक ते लोकसभा अध्यक्ष अशी दैदिप्यमान कारकीर्द असलेले, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी (८७) यांचं निधन झाल्याचं वृत्त अत्यंत दुःखद आहे. त्यांच्या निधनाने एका बुद्धिमान आणि चाणाक्ष नेत्याला आपण गमावलं.
भावपूर्ण श्रद्धांजली! pic.twitter.com/rDGCXwA4Tr— Rohit Pawar (@RRPSpeaks) February 23, 2024
अधिक वाचा –
– शासनाच्या ‘माझी शाळा – सुंदर शाळा’ उपक्रमात कान्हे शाळा तालुक्यात अव्वल! जिल्हा स्तरावर बाजी मारण्यासाठी शाळेची तयारी
– वडगाव शहरात 112 वाहनांची मोफत वायू प्रदूषण चाचणी आणि पीयूसी प्रमाणपत्र वाटप । Vadgaon Maval
– लोणावळा जवळील लायन्स पॉइंट येथे दरीत कोसळून 20 वर्षीय तरुणीचा मृत्यू । Lonavala News