Dainik Maval News : देहूरोड येथील आंबेडकर नगर भागात वाढदिवसाच्या कार्यक्रमात गोळीबार करून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी एका सराईत गुन्हेगारासह चौघांना अटक केली आहे. याच घटनेत दोन गोळ्या लागल्याने एकाचा मृत्यू देखील झाला. ही घटना 13 फेब्रुवारी रोजी रात्री साडेअकरा वाजता आंबेडकरनगर (देहूरोड) येथे घडली.
मलिक कुमार इंद्रा (वय 18, रा. देहूरोड) यांनी गुरुवारी (दि.20) याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी, साबीर समीर शेख (वय 24), फैजल खान (वय 24), जॉनी उर्फ साइतेजा चित्तामल्ला (वय 24), अभिषेक रेड्डी (वय 24) या आरोपींना अटक केली आहे. यांसह साकिब जिलानी, दिनेश कानेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी इंद्रा आणि त्यांचा मित्र साई भीम रेड्डी हे नंदकिशोर यादव यांच्या घरी वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी गेले होते. कार्यक्रम झाल्यानंतर ते घराबाहेर गप्पा मारत असताना आरोपी तिथे आले. त्यांनी नंदकिशोर यादव यांच्याशी वाद घातला. त्यामुळे ते भांडण सोडविण्यासाठी इंद्रा आणी त्यांचा मित्र रेड्डी गेले. त्यावेळी आरोपी साबीर याने गोळीबार करत रेड्डी यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान इंद्रा आणि रेड्डी हे दुचाकीवरून पळून गेले. इंद्रा हे या घटनेत घाबरल्यामुळे ते गुरुवारी पोलीस ठाण्यात आले आणि गुन्हा दाखल केला. याच घटनेत साबीर याने एका व्यक्तीवर गोळीबार करून ठार मारले. त्याबाबत वेगळा गुन्हा दाखल आहे. देहूरोड पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– देहू नगरपंचायतीचा 97 कोटी 99 लाखाचा अर्थसंकल्प सादर, विशेष सभेत अर्थसंकल्प मंजूर । Dehu News
– तळेगाव-चाकण महामार्गाच्या कामाला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळावी ; कृती समितीचे मुख्यमंत्र्यांना निवेदन । Maval News
– मोठी बातमी ! ‘पीएमआरडीए’चा मोठा निर्णय, आता नऊ तालुक्यांत होणार PMRDA चे कार्यालय, मावळचाही समावेश