मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर एक भीशण अपघात घडला आहे. आज, सोमवार (दिनांक 21 ऑगस्ट) रोजी सकाळी 09.00 वाजताच्या सुमारास कंटेनर ( क्रमांक MH 46 AR 0181 ) हा कंटेनर पुण्याकडून मुंबईकडे जात होता. तेव्हा किलोमीटर 35 जवळ सदर कंटेनरने मुंबईकडील लेन सोडून पुणे बाजूकडील लेन वर येऊन पलटी झाला. सदर अपघातात एकूण 5 छोट्या कार बाधीत झाल्या आहे. तसेच सुझुकी डिझायर कार (क्रमांक MH 48 A 6512 ) या कारमधील 1 चालक व 1 महिला असे जागीच मृत पावले आहेत.
सदर कार मधील 2 जखमी महिलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच इतर कार मधील 2 महिला जखमी असून त्यांना देखील एमजीएम रुग्णालय कामोठे येथील दाखल केले आहे. मुंबईकडे जाणाऱ्या लेन वरून वाहतूक सुरळीत सुरू आहे. पुणे दिशेकडे जाणारी वाहतूक संथ गतीने असून अपघात झालेली वाहने बाजूला काढताना काही वेळासाठी वाहतूक थांबवण्यात आलेली होती. सध्या वाहतूक सुरळीत करण्यात येत आहे. ( four injured as container overturns on Mumbai Pune Expressway Two killed )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– ‘मावळ आपलाच…समझनें वालों को इशारा काफी’, काँग्रेसच्या प्रणिती शिंदेंचे शिवसेना – भाजपा – राष्ट्रवादीला खुले आव्हान
– शिवसेना (उ.बा.ठा.) पक्षाची मावळ लोकसभा मतदारसंघाची आढावा बैठक संपन्न; उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ठरली रणनिती
– आमदार सुनिल शेळकेंनी घेतला पवन मावळमधील पूर्व भागातील गावांच्या विकासकामांचा आढावा; शनिवारी काले इथे बैठक