तळेगाव दाभाडे येथील सीआरपीएफ कॅम्प मध्ये अधिकारी असल्याचे सांगून एका व्यक्तीची दीड लाखांची फसवणूक करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. दिनांक 22 ऑगस्ट ते 26 ऑगस्ट दरम्यान फसवणूकीची ही घटना चाकण इथे घडली. दिनेश भटूसिंग जाधव (वय 42, रा. आंबेठाण रोड, चाकण) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुमित कुमार, लोकेश कुमार कुमावत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी ते सीआरपीएफ कॅम्प तळेगाव दाभाडे येथे अधिकारी असल्याचे फिर्यादीस सांगितले. त्यानंतर वेगवेगळ्या कारणांसाठी फिर्यादीकडून 1 लाख 53 हजार रुपये घेतले. ते पैसे परत न देता फिर्यादी यांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीने फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी भादवी कलम 419, 420, 34 सह माहिती व तंत्रज्ञान अधिनियन अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अद्याप अटकेत नसून चाकण पोलीस वपोनी शिंगारे हे ह्या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. ( fraud of 1 lakh 53 thousand by claiming to be an officer in talegaon CRPF camp )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– वडगावमधील राज्यस्तरीय बेंचप्रेस स्पर्धेत शिवदुर्ग फिटनेसच्या खेळाडूंना घवघवीत यश; अशोक मते यांचा खास सन्मान
– राज्यपाल रमेश बैस यांचा लोणावळा दौरा, स्वामी कुवलयानंद योग पुरस्काराचे केले वितरण, कैवल्यधाम योग संस्थेलाही दिली भेट
– तब्बल 11 वेळा आमदार राहिलेल्या गणपतराव देशमुख यांच्या जीवनावर येतोय ‘कर्मयोगी आबासाहेब’ चित्रपट