सार्वजनिक बांधकाम विभागात (पी.डब्ल्यू.डी.) नोकरीला लावण्याच्या आमिषाने युवकाच्या वडिलांकडून 5 लाख रुपये घेतले. मात्र, मुलाला नोकरीला न लावता आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दिनांक 22 फेब्रुवारी 2021 ते 12 ऑगस्ट 2021 या कालावधीत तळेगाव दाभाडे इथे हा प्रकार घडला. याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिसांनी एकाला अटक केली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
प्रमोद पंढरीनाथ चौधरी (वय 66, रा. तळेगाव दाभाडे) यांनी याप्रकरणी दिनांक 4 जानेवारी 2024 रोजी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी कैलास विश्वनाथ भालेराव (वय 36, रा. तळेगाव दाभाडे) याच्यावर भादवी कलम 420, 406 अन्वये गुन्हा दाखल करत त्याला पोलिसांनी अटक केली आहे. ( fraud of 5 lakhs with lure of employment talegaon dabhade police crime news maval )
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चौधरी यांच्या मुलाला सार्वजनिक बांधकाम खात्यात (पी.डब्लू.डी) खात्यात नोकरी लावतो असे कैलास भालेराव याने नोककरीचे आमिष दाखवले. त्यातून त्याने चौधरी यांच्याकडून 5 लाख 7 हजार रुपये घेतले. त्यानंतर चौधरी यांच्या मुलाला नोकरीला न लावता त्यांच्याकडून घेतलेले पैसे परत न करता त्यांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तळेगाव दाभाडे पोलीस उपनिरिक्षक मुल्ला हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
अधिक वाचा –
– शिवली गावचा पै. विपुल आडकर ठरला ‘मावळ केसरी’ किताबाचा मानकरी; पै. सनम शेख बनली ‘महिला मावळ केसरी’ । Maval Kusti Kesari
– पार्थ पवार शिरूरमधून लढणार की मावळमधून? अजितदादांनी स्पष्टच सांगितलं… । Ajit Pawar & Parth Pawar
– मोठी बातमी! भुगावजवळील मानस तलावात कारमध्ये आढळला मृतदेह, गाडी तरंगताना दिसल्यावर प्रकार उघडकीस, परिसरात खळबळ । Pune News