वडगाव नगरपंचायतीचे माजी नगरसेवक प्रसाद पिंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त वडगाव शहरात बुधवारी (दि. 21) 112 वाहनांची मोफत वायू प्रदूषण चाचणी करण्यात आली. तसेच सर्व वाहनधारकांना मोफत पीयूसी प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. माजी नगरसेवक तथा वडगाव शहर भाजपाचे कार्याध्यक्ष प्रसाद अरविंद पिंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त वडगाव भाजपाच्या वतीने हा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
वडगाव मावळ शहरातील चावडी चौक येथे दुचाकी, तीनचाकी (रिक्षा) वाहनांसाठी हा मोफत वायू प्रदूषण चाचणी उपक्रम राबवण्यात आला. शहरातील एकूण 112 वाहनधारकांनी यावेळी लाभ घेतला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वाहनधारकांना तत्काळ पीयूसी सर्टिफिकेटही देण्यात आले. यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष अनंता कुडे यांनी सर्व वाहन चालकांना पीयूसी प्रमाणपत्र बद्दल विस्तृत माहिती दिली आणि महत्व समजून सांगितले. तर युवा मोर्चा अध्यक्ष विनायक भेगडे यांनी सर्वांचे आभार मानले. ( free air pollution test of 112 vehicle and puc certificate distribution in vadgaon maval )
ह्यावेळी ज्येष्ठ नेते अरविंद पिंगळे, पंढरीनाथ भिलारे, सोमनाथ काळे, दीपक बवरे, प्रदीप बवरे, प्रवीण चव्हाण, ॲड. विजयराव जाधव, शामराव ढोरे, रवींद्र काकडे, भूषण मुथा, शंकरराव भोंडवे, रविंद्र म्हाळसकर, मकरंद बवरे, सचिन ढोरे, निलेश म्हाळसकर, ॲड. अजित वहिले, नितीन कुडे, संभाजीराव म्हाळसकर , सुधाकर ढोरे, बाळासाहेब वाघमारे, विजयराव सुराणा, बाळासाहेब भालेकर, गणेश विनोदे, रामदास वाडेकर, प्रशांत चव्हाण, संतोष ढोरे, हेमंत काकडे, शिवाजीराव असवले, नामदेवराव ढोरे, नंदकुमार जाधव, महेंद्र म्हाळसकर, संतोष भालेराव, मनोज जाधव, मनोज पोफळे, गणेश भेगडे, महेंद्र अ. म्हाळसकर, संतोष म्हाळसकर, सतीश म्हाळसकर, सुरेंद्र बाफना, दीपक पवार, विकास पिंगळे, रिचा पिंगळे, श्लोक पिंगळे, वरद पिंगळे, स्वानंद भालेकर, देवेश भालेकर आदी कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.
अधिक वाचा –
– पुणे जिल्हा न्यायालय आणि सर्व तालुका न्यायालयांमध्ये 3 मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन । National Lok Adalat
– मावळकन्येची दमदार कामगिरी! वेदांगी असवले हिने मिळवला आंदर मावळातून प्रथम सीए बनवण्याचा मान । Maval News
– पुणे जिल्हा न्यायालय आणि सर्व तालुका न्यायालयांमध्ये 3 मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन । National Lok Adalat